VIDEO : ऐसी धाकड है! छेड काढणाऱ्या युवकाला शाळकरी मुलीने घडवली अद्दल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका शाळकरी मुलीने त्यांना छेडणाऱ्या दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली.

पुजा पवार | Updated: Sep 9, 2024, 04:04 PM IST
VIDEO : ऐसी धाकड है! छेड काढणाऱ्या युवकाला शाळकरी मुलीने घडवली अद्दल title=
( Photo Credit : Social Media )

एक असा काळ होता जेव्हा बदमाष मुलं रस्त्यावर खुलेआम मुलींची छेड काढायचे. यावेळी मुली त्यांना प्रतिकार करायला घाबरायच्या, परंतु आता काळ बदललाय. आता मुली रस्त्यावर खुलेआम छेडणाऱ्या मुलांना घाबरत नाहीत तर प्रतिकार देखील करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका शाळकरी मुलीने त्यांना छेडणाऱ्या दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. ही घटना उत्तर प्रदेशातील असून तिथे एका शाळेत जाणाऱ्या मुलीची एका दुचाकीस्वाराने छेड काढली. मग मुलीनेही न घाबरता प्रतिकारक करून दुचाकीस्वारावर दगडांचा वर्षाव केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

सदर घटना ही बरेली येथील बारादरी क्षेत्राच्या संजय नगर येथील असून व्हायरल व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार युवक शाळेत जाणाऱ्या तीन मुलींचा पाठलाग करत होता. या दुचाकीस्वाराने मुलींना अश्लील गोष्टी बोलल्या.  तेव्हा तीनपैकी दोन विद्यार्थिनी या घाबरून एका गल्लीत पळून गेल्या तर एका विद्यार्थिनीने  रस्त्याच्या कडेला ठेवलेली दगडं उचलून त्या दुचाकीस्वारावर हल्ला केला. यानंतर युवक तेथून पळून जातो. 

हेही वाचा : इंटरनेट Shocked! युट्यूबरने घटवले 114 किलो वजन; म्हणाला- 'लोकांना मूर्ख बनवणं फार सोपं' 

पालकांनी पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार : 

पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी बारादरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाची माहिती देताना एसपी सिटी राहुल भाटी यांनी सांगितले की, संजय नगरमध्ये एका दुचाकीस्वाराने मुलींना अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. पोलीस आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल. 

कराटे गर्लने मुलांना धुतलं : 

उत्तराखंडच्या नैनीताल येथील हल्द्वानी येथे कार चालवणाऱ्या मुलांनी दोन मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलींनी रस्त्यातच त्या मुलांना धुतलं. कराटे गर्ल्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. मुलींनी छेड काढणाऱ्या मुलांना चांगली शिक्षा दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.