आपल्या कारमध्ये CNG किट बसवण्यापूर्वी या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

 Second Hand CNG Car Guide | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता भारतीय ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत आणि त्यामुळेच नवीन आणि सेकंड हँड सीएनजी कारची मागणी जोरदार वाढली आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला सीएनजी कार वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी सांगत आहोत.

Updated: May 14, 2022, 03:34 PM IST
आपल्या कारमध्ये CNG किट बसवण्यापूर्वी या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका title=

मुंबई : Second Hand CNG Car Guide | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता भारतीय ग्राहक आता पर्यायी इंधनाकडे वळत आहेत आणि त्यामुळेच नवीन आणि सेकंड हँड सीएनजी कारची मागणी जोरदार वाढली आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला सीएनजी कार वापरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी सांगत आहोत.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी लोकांचे लक्ष सीएनजीकडे वेधले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची मागणी खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत नवीन कार खरेदी करणारे लोक सीएनजी कार खरेदी करत आहेत. परंतु जे लोक सेकंड हँड कार घेत आहेत, त्यांना बाहेरून सीएनजी बसवले जात आहे. परंतू हे त्यांच्या कारसाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत सेकंड हँड सीएनजी कार खरेदी करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

फॅक्टरी फिट सीएनजी कार खरेदी करणे अधिक महत्त्वाचे

तुम्हीही आजकाल सेकंड हँड सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल किंवा वापरलेली सीएनजी कार चालवत असाल तर तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. फॅक्टरी फिट सीएनजी कार खरेदी करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण कंपन्या त्यांच्या सीएनजी कारच्या सुरक्षेवर विशेष भर देतात.

वेळोवेळी सीएनजी किट तपासत राहा

जर तुम्ही सेकंड हँड सीएनजी कार खरेदी केली असेल किंवा आधीच वापरलेली सीएनजी कार वापरत असाल, तर तुम्ही वेळोवेळी मार्केट सीएनजी किट तपासत राहा. कोठूनही गॅस गळती होऊ नये वेळोवेळी तपासणी करीत राहा.

सर्वाधिक अपघात

गेल्या काही वर्षांत कारच्या सीएनजी किटमध्ये स्फोट झाल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. बहुतेक स्फोट गॅस इंधन भरण्याच्या वेळी होतात. म्हणूनच तुमच्या लक्षात आले असेल की सिलिंडर भरताना पंपवाले सर्वांना गाडीतून उतरायला सांगतात.

सिलिंडर भरताना या गोष्टी ठेवा लक्षात

जेव्हाही तुम्ही गॅस भरण्यासाठी सीएनजी स्टेशनवर जाल तेव्हा गाडीतून उतरून काही अंतर चालत जा. गॅस रिफ्यूलिंग दरम्यान कारमध्ये अजिबात बसू नका. वेळोवेळी सीएनजी सिलेंडरमध्ये काही गळती आहे का ते तपासा. या सर्वांसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कारमध्ये कमी किमतीत निकृष्ट दर्जाचे सीएनजी किट बसवू नका.