खिडकीवर रेल्वे तिकीट काढताय? तरी सुद्धा ५ टक्के डिस्काऊंट असा मिळवा...

 रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचा आता प्रवास आणखी स्वस्त होण्याचा एक पर्याय रेल्वे डिपार्टमेंटने उपलब्ध केला आहे. 

Updated: Jun 7, 2021, 08:20 PM IST
खिडकीवर रेल्वे तिकीट काढताय? तरी सुद्धा ५ टक्के डिस्काऊंट असा मिळवा... title=

मुंबई : जर आपल्यापैकी कोणताही लांबचा प्रवास करायचा असेल, तर कोणीही रेल्वे प्रवासाचाच मार्ग अवलंबतो. कारण तो कमी खर्चिक आणि आरामदायी असतो. तसेच ट्रेन प्रवास केल्याने वेळेवर आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचता येणे शक्य होते आणि ट्रॅफिकमध्ये अडकण्याची ही वेळ येत नाही. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचा आता प्रवास आणखी स्वस्त होण्याचा एक पर्याय रेल्वे डिपार्टमेंटने उपलब्ध केला आहे. ज्यामुळे प्रवासांना त्यांच्या तिकीटावर 5% डिस्काउंट मिळणार आहे. परंतु याच्यासाठी प्रवासांना काय करावे लागणार हे जाणून घ्या

रेल्वे तिकीटावर 5% जास्तीचा डिस्काउंट मिळण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त तुमचे पेमेंट करताना तुम्हाला BHIM UPI द्वारे रेल्वेला पैसे द्यावे लागतील. परंतु याची एक मर्यादा आहे. कारण सरकारने ही ऑफर 12 जून 2022 पर्यंत ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला रेल्वेचे डिस्काउंटचा लाभ घ्यायचा असेल तर तो तुम्ही 12 जून 2022 पर्यंत घेऊ शकता.

रेल्वेने ही सुविधा देण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, रेल्वे आता डिजीटल इंडिया च्या दिशेने आपली वाटचाल करत आहे. त्यांनंतर कोरोनाकाळात कोणत्याही गोष्टीशी संपर्क कमी करण्याच्या दृष्टीकोनातून देखील रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. डिजीटल माध्यमातून पेमेंट केल्याने काम वेगाने होते, तसेच सगळेचे लोकं डिजीटल सेवेकडे जोडले जातील आणि याचा आपला देशाच्या आर्थिक परिस्थितीवर देखील प्रभाव पडू शकतो.