'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल

एका मुस्लिम तरुणीशी गैरवर्तणूक करत त्याचा व्हिडिओ बनवल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Updated: Jun 10, 2023, 03:34 PM IST
'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल title=

Viral Video : हिंदू मित्राच्या दुचाकीवर बसल्याने एका मुस्लिम तरुणीबरोबर (Muslim Girl) गैरवर्तणूक (Misbehavior) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला असून लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. ही मुलगी आपल्या हिंदू मित्राबरोबर (Hindu Friend) त्याच्या दुचाकीवरुन जात होती. याचवेळी एका मुस्लिम तरुणाने तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिला रस्त्यात थांबवत हिंदू मित्राबरोबर का फिरतेयस असा तिला जाब विचारला. दरम्यान, या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद (UP Moradabad) इथली ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे त्या तरुणाने मुलीबरोबर केलेल्या गैरवर्तणूकीचा व्हिडिओ देखील बनवला. या तरुणाने मु्स्लिम तरुणीला थांबवत तिला उलट-सुलट प्रश्न विचारले. तू हिंदू मुलाबरोबर दुचाकीवर का बसलीस? तुला दुसरं कोणी भेटलं नाही का? यावर मुलीने हा आपला मित्र असल्याचं सांगितलं. दुचाकीवर बसलेल्या मुलाने आपण तिच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखत असल्याचं सांगितलं यानंतरही अडवणूक करणाऱ्या मुलाने त्यांना सोडलं नाही. 

त्या मुलीला आणि मुलाला जाब विचारतच राहिला. तुला माहित नाही का सध्या काय परिस्थिती चालली आहे. तुझ्या सारख्या मुली समाजाच नाव खराब करतात, असा आरोपही तिच्यावर केले गेले. अखेर त्या मुलीने आपल्या वडिलांना फोन लावला. मुलीच्या वडिलांनी अडवणूक करणाऱ्या तरुशी फोनवर बातचित केली त्यानंतर हे प्रकरण थांबलं. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार सुरु असताना आजूबाजूला बघ्यांची गर्दी झाली. पण एकानेही त्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

तरुणाविरुद्ध तक्रार दाखल
या प्रकरणी मुलीने व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधिकारी अखिलेश भदोरिया यांनी दिली आहे. जातीच्या नावावर कोणी गैरवर्तणूक करत असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, रस्त्याने जाणाऱ्या कोणाबरोबरही मग ती महिला असो की पुरुष गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही असं अखिलेश भदोरिया यांनी सांगितलं.