विकृतीचा कळस! अत्याचार करतानाचा फोटो काढला, व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीच्या कृत्याने तुम्हालाही येईल संताप, कठोर शिक्षेची मागणी

Updated: Nov 11, 2022, 10:54 PM IST
विकृतीचा कळस! अत्याचार करतानाचा फोटो काढला, व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला title=

Crime News : एक धक्कादायक तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नराधमाने अल्ववयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. विकृतीचा कळस म्हणजे अत्याचार करताना या नराधमाने त्याचे फोटो काढले आणि ते आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर (WhatApp Status) ठेवले. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या नराधमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) अतरातील दौरान गावातील ही धक्कादायक घटना आहे. अल्पवयीन मुलगी कामावर जात होती, यावेळी आरोपीने तिला अडवलं आणि धमकावत तिला जवळच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले.

आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करत पीडित मुलीने घर गाठलं आणि कुटुंबियांना आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पीडित मुलीच्याच गावचा असून दोघंही एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच याच जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेतही आरोपींनी मोबाईलवर व्हिडिओ बनवला होता, आणि पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनांनी परिसरात भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.