मुंबई : भारतीय संस्कृतीत नामकरण विधीला प्रचंड महत्त्व आहे. नवीन जन्म झालेल्या बाळाच्या आई वडिलांना नेहमीच असं वाटतं की त्यांच्या बाळाचे नाव हे यूनिक असावे. त्यांचा बाळासारखं नाव ना नात्यात असावे ना शेजारी असावे. बाळाचे नाव जर यूनिक असेल तर त्या नावाचा व्यक्तिमत्तवावर देखील चांगलाच प्रभाव पडतो. म्हणूनच बाळाच्या आई वडिलांना यूनिक नाव शोधण्याची अधिक चिंता असते. बऱ्याचदा घरातली मंडळी, नातेवाईक आणि शेजारचे देखील वेगवेगळी यूनिक नावे सूचवत असतात. तर चला पाहूया काही यूनिक नावे त्यांच्या अर्थासहित.
- नक्श: न अक्षरावरून नक्श. हे नाव खूपच गोड आहे. नक्श या नावाचा अर्थ निशान किंवा चित्र असा आहे.
- अनभ्य: अ अक्षरावरून अनभ्य. अनभ्य याचा अर्थ ज्याला कोणी झुकवू शकत नाही. या नावाला शूर आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. अनभ्य हे नाव सगळ्यानांच यूनिक वाटेल असे आहे.
- तुमच्या मुलासाठी ध्वनिश हे नाव देखील यूनिक आहे. ध्वनिशचा अर्थ मधुर ध्वनी किंवा आवाज असा आहे. ध अक्षरावरून तयार होणारं हे नाव खूपच वेगळं आहे.
- कियांश हे नाव देखील खूप छान आहे. या नावाचा अर्थ सर्व गुण असलेली व्यक्ती.
- सुवेश: स अक्षरावरून सुवेश हे नाव देखील खूप यूनिक आहे. सुवेश या नावाचा अर्थ सुंदर वेशभूषेचे ज्ञान असणारी व्यक्ती.
- प्राणांश हे नाव देखील खूप छान आहे. या नावाचा अर्थ जीवनाचा भाग. जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव प वरुन ठेवणार असाल तर हा एक छान पर्याय आहे.
- गतिक: ग अक्षरावरून गतिक हे नाव देखील आगळं वेगळं आहे. गतिक या नावाचा अर्थ गतीशील असणे असा आहे.