पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : देशात सर्वात मोठा गंभीर भेडसावणारा प्रश्न म्हणजे रस्त्यावरील खड्डे (Road potholes) दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे (Potholes on roads during monsoons) हा विषय चर्चेसाठी असतो. अनेक रस्ते डांबरी असूनही, खड्डे समस्या या वर्षीही मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. डांबरी रस्त्यावर खड्डे (Potholes on asphalt roads) पडण्याची विविध कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण आहे, रस्ते खोदाई (Digging roads) खोदाईचे काम झाल्यानंतर पुनर्डांबरीकरण, पुनर्भरणी व्यवस्थित होत नसल्याने, रस्ते खराब (Bad roads) होण्याचे प्रमाण वाढत आहे. परंतु हा गंभीर प्रश्न लवकरच केंद्र सरकारच्या (Central Govt) मदतीने सुटणार आहे.
रस्त्यांवरील दर्जा सुधारण्यावर आता अधिक लक्ष दिले जाणार आहे. यासाठी मोबाईल इन्स्पेक्शन व्हॅनचा (Mobile Inspection Van) वापर करण्यात येणार असून त्याद्वारे महामार्गाचा रिअल टाइम डेटा (Real time highway data) उपलब्ध होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालय (Union Ministry of Roads and Highways) देशभरात अशा प्रकारच्या देखरेखीची योजना आखणार आहे. हे व्हॅन रस्त्यांचे कोणतेही नुकसान न करता दर्जेदार डेटा (Quality data) उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून कुठे कमतरता आहे आणि त्याची जबाबदारी कोणाची आहे हे लगेच आता कळू शकणार आहे.
रस्ते अपघातांचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्यांचा दर्जा (Quality of roads). रस्त्यांच्या दर्जाकडे केंद्रीय मंत्रालयाने लक्ष (attention of the Union Ministry) देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळेच मोबाईल इन्स्पेक्शन व्हॅनचा (Mobile Inspection Van) वापर गुजरात आणि कर्नाटकसह (Gujarat Karnataka) काही राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून हाती घेण्यात आला आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. पुढील वर्षअखेरीस देशातील सर्व महामार्गांवर त्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केंद्रीय महामार्ग मंत्रालयाचं (Union Ministry of Highways) आहे.
देशभरातील प्रत्येक रस्त्याचे निरीक्षण करणं सोपं काम नाही आणि ते केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद आणि प्रभावीपणे लागू केलं जाऊ शकतं. मोबाईल इन्स्पेक्शन व्हॅनला रस्ते (Roads to mobile inspection vans) बांधकाम गुणवत्तेचा रिअल टाइम डेटा प्राप्त (Get real time data of construction quality) होणार आहे. जो एकाच पोर्टलद्वारे सर्व भागधारकांसह सामायिक केला जाईल जेणेकरून त्रुटी त्वरित दुरुस्त केल्या जाऊ शकतील. या यंत्रणेच्या माध्यमातून तीन महिन्यांत सुमारे दोन हजार किलोमीटर रस्त्यांची पाहणी करण्याची तयारी सुरू आहे. हळूहळू ही व्याप्ती वाढवली जाणार आहे.
आणखी वाचा - शाहरूख 11 तर सलमानला.... गाढवं करतात करोडोंचा बिझनेस!
भारतातील एकूण रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा वाटा (Share of National Highways) केवळ तीन ते चार टक्के आहे. सर्व रस्त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने ही एक मोठी सुरुवात असू शकते. देशातील सुमारे चाळीस टक्के रस्ते कच्च्या श्रेणीत (Forty percent of the roads are unpaved) मोडतात. रस्त्यांच्या डिझाईनमधील त्रुटी (Road design error) तसेच निकृष्ट देखभालीचा धोका (Risk of poor maintenance) आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी वार्षिक बजेटची तरतूद गरजेच्या केवळ 40 टक्के आहे. मात्र, देखभालीसाठी बजेट वाढवण्याची तयारीही केंद्रीय मंत्रालय करत आहे.