बंगळुरु : कर्नाटकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. हा अपघात हावेरी जिल्ह्यात हालागिरी येथे झाला. एका ट्रकने हेडगे यांच्या ताफ्यातील गाडीला ठोकले. हा अपघात नसून मला ठार मारण्याचा प्रयत्न झालाय, असा दावा केंद्रीय मंत्री हेडगे यांनी केलाय. त्यामुळ याप्रकरणाला वेगळे वळण लागलेय.
केंद्रीयमंत्री अनंत कुमार हेगडे हे मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास रस्तामार्गे जात असताना हालागिरी येथे त्यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला. एका ट्रकने हेगडे यांच्या ताफ्यातील गाडीला धडक दिली. दमम्यान, गाडीचे नुकसान झाले असून हेगडे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, माझ्याविरोधात हा कट असून मला ठार मारण्याचा प्रयत्न असल्याचे मत हेगडे यांनी यावेळी व्यक्त केले.
अपघाताच्यावेळी सुदैवाने मी ज्या गाडीत बसलेलो ती गाडी वेगात असल्यामुळे धडक टळली पण ताफ्यातील दुसऱ्या गाडीला ट्रक धडकला, असे हेगडे म्हणाले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. नासीर असे ट्रक चालकाचे नाव आहे. हेगडे यांनी अपघातानंतर घटनास्थळावरचा व्हिडिओ आणि अटक केलेल्या ट्रक चालकाचे फोटो टि्वटरवर पोस्ट केलेय.
I urge the police to take the case seriously in spilling the truth out from this guy named Nasir. There might be a bigger nexus behind this incident and am sure Police would expose all of them. pic.twitter.com/CXQuEZKMqD
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) April 17, 2018
ट्रकच्या धडकेत हेडगे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कारमधील काही जण जखमी झालेत. खांद्याला फॅक्चर झालेय. ही घटना अपघात नसून मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता. ड्रायव्हरने जाणीवपूर्वक माझ्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला, असे हेगडे म्हणाले.
I suspect serious attempt on my life looking at the incident as it doesn't make an accident. The driver has purposefully tried hitting our vehicle and then hit our escort vehicle which is quiet evident in this video. pic.twitter.com/zAZjGwIWqq
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) April 17, 2018