मुंबई : हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या देशात बोलावल्यावर पाकिस्तानानं त्यांची लायकी दाखवून दिलीय... जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीमुळे पाकिस्तानच्या 'कनवाळू'पणाचा पर्दाफाश झालाय, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय.
कुलभूषण जाधव यांच्या आईला त्यांच्या मुलाशी मराठीत बोलूही दिलं गेलं नाही. शिवाय सुरक्षेच्या कारणे देऊन आई आणि पत्नीच्या अंगावरचे मंगळसूत्र, कपाळवरची टिकली, हातातल्या बांगड्याही हातावर काढून ठेवायला लावण्यात आले.
पाकिस्ताननं सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांचं सपशेल उल्लंघन केल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला. आज कुलभूषण जाधव यांची पत्नी, आई आणि वडीलांनी पररराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
झाल्या प्रकाराची पररराष्ट्र मंत्र्यांनी तीव्र शब्दात निंदा केली आहे. दोन देशामधल्या परराष्ट्रीय संबंधांचे सारे नियम पाकिस्ताननं धाब्यावर बसवल्याचं आज भारतानं म्हटलंय.