'मोदी सरकार म्हणजे पेपर लीक सरकार' UGC-NET परीक्षा रद्द होताच काँग्रेसचा घणाघात

UGC-NET June 2024 examination cancelled:  NEET परीक्षेनंतर आता नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले असून गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 20, 2024, 07:50 AM IST
'मोदी सरकार म्हणजे पेपर लीक सरकार' UGC-NET परीक्षा रद्द होताच काँग्रेसचा घणाघात  title=
UGC NET Exam cancellation congress slams bjp government saying leak government

UGC-NET June 2024 examination cancelled: देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक घटकांची वक्रदृष्टी असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे. वैद्यकिय क्षेत्रातील प्रवेशपरीक्षा अर्थात NEET परीक्षेसंदर्भातील घोटाळा समोर आलेला असतानाच शिक्षण मंत्रालयाकडून एकाएकी राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) कडून आयोजित केल्या जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेलाही रद्द करण्याचा निर्णय घेत सदर प्रकरणी CBI कडे चौकशीचे आदेश दिले. 

शिक्षण मंत्रालयानं पाटणा येथील (NEET)-UF 2024 च्या कथित स्वरुपातील आयोजनामध्येही गैरव्यवहार झाल्याची बाब अधोरेखित करत त्यासंदर्भाह बिहार पोलिसांच्या इकोनॉमिक क्राइम युनिटकडून सविस्तर अहवाल मागितला आहे, ज्याआधारे पुढील कारवाई करण्यात येईल. 

शिक्षण मंत्रालयाकडून आधीच दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेली UGC-NET जून 2024 परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता तिचं पुन्हा आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. युजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचं वृत्त समोर येताच देशभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडूनही यासंदर्भात मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली. X च्या माध्यमातून पोस्ट करत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारला काँग्रेसनं 'पेपर लीक सरकार’ असं उपरोधिक नाव देत या साऱ्याची जबाबदारी शिक्षण मंत्री कधी घेणार? असा सवाल उपस्थित केला. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी सरकारला निशाण्यावर घेत 'परीक्षा पे चर्चा' करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी NEET परीक्षांवर केव्हा चर्चा करणार? असाही प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीसुद्धा युजीसी नेट परीक्षा रद्द करणाऱ्या सरकारची निंदा करत त्यांनी या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित असल्याची मागणी स्पष्ट शब्दांत केली. 

UGC NET Exam cancellation congress slams  bjp government saying leak government

नेट परीक्षा इतकी महत्त्वाची का? ही परीक्षा कोण देतं? 

युजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा आयोजिक केली जाते. या परीक्षेमध्ये एकूण 83 विषयांचा समावेश असून, ती उत्तीर्ण करणाऱ्या परीक्षार्थींना पुढं शिक्षक बनण्यासाठीची पात्रता प्राप्त होते. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्रत विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणं अपेक्षित आहे. आरक्षण प्रवर्गांसाठी शैक्षणित पात्रतेमध्ये 5 टक्क्यांची मुभा दिली जाते. यूजीसी जेआरएफसाठी 30 वर्षे इतकी वयोमर्यादा असून, नेटसाठी मात्र कोणतीही वयाची अट नाही.