UGC Fellowships 2023: विद्यापीठ अनुदान समितीने (UGC) विविध फेलोशिप योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या रकमेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आयोगाने फेलोशिपमध्ये मिळणाऱ्या रकमेत बदल करुन विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढवली आहे. 20 सप्टेंबर रोजी आयोगाच्या 572व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने फेलोशिप योजना रिवाइज करण्याचा प्रस्तावदेखील स्वीकारला आहे. बदलण्यात आलेली फेलोशिप स्टायपेंड 1 जानेवारी 2023पासून लागू होणार आहे. यासंदर्भात आयोगाने एक नोटिसदेखील जारी केली आहे.
आयोगाने आपल्या नोटिसीत नमूद केलं आहे की, फेलोशिपअंतर्गंत वाढवण्यात आलेल्या रकमेचा फायदा उमेदवारांना होणार आहे. विद्यापीठ अनुदान समिती म्हटलं आहे की, 20 सप्टेंबर 2023मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 572व्या बैठकीत यूजीसी फेलोशिप स्कीमअंतर्गंत येणाऱ्या फेलोशिपची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. आता उमेदवारांना वाढवून मिळालेल्या रकमेचा फायदा होणार आहे.
ज्युनिअर रिसर्च फेलोशिप म्हणजेच JRFची रक्कम 2 वर्षांपर्यंत 31 हजार रुपयांनी वाढवून 37 हजार दर महिना करण्यात आली आहे. तर ,सिनिअर रिसर्च फेलोशिप म्हणजेच SRFची रक्कम 35 हजारांनी वाढवून 42 हजार दर महिना करण्यात आली आहे.
अविवाहित मुलीसाठी सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिपची रक्कम JRF साठी 31 हजार रुपयांवरून 2 वर्षांसाठी प्रति महिना 37 हजार रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, एसआरएफची रक्कम 35 हजार रुपयांवरून 42 हजार रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
डीएस कोठारी पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपमधील उच्च पोस्ट डॉक्टरेट शिष्यवृत्ती रुपये 54,000 वरून 67,000 रुपये करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, पोस्टडॉक्टरल फेलोशिपची रक्कम एका वर्षासाठी रुपये 47,000 वरून 58,000 रुपये आणि दोन वर्षांसाठी रुपये 49,000 वरून 61,000 रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, ते 3 वर्षांसाठी 54000 रुपयांवरून 67000 रुपये करण्यात आले आहे.
पोस्ट डॉक्टरोल फेलोशिप फॉर वुमन या शिष्यवृत्तीची रक्कम 47,000 रुपयांवरुन 58,000 रुपये करण्यात आली आहे.
पीडीएफ फॉर एससी, एसटी याची रक्कम 49,000 रुपयांवरुन 61,000 दर महिना करण्यात आली आहे.
एस राधाकृष्णन पीडीएफ रक्कम 54,000 रुपयांवरून 67000 रुपये प्रति महिना केली आहे.