'मुघल गार्डन'मधला 'उद्यानोत्सव' सुरू

दिल्लीत फुलांचा सोहळा सुरू झालाय... दरवर्षी इथले ट्युलिप्स बघायला पर्यटकांची प्रचंड गर्दी होते... यंदा तब्बल दहा हजार 'ट्युलिप्स' आकर्षण असणार आहेत.  

Updated: Feb 6, 2018, 07:27 PM IST
'मुघल गार्डन'मधला 'उद्यानोत्सव' सुरू  title=

नवी दिल्ली : दिल्लीत फुलांचा सोहळा सुरू झालाय... दरवर्षी इथले ट्युलिप्स बघायला पर्यटकांची प्रचंड गर्दी होते... यंदा तब्बल दहा हजार 'ट्युलिप्स' आकर्षण असणार आहेत.  

'मुघल गार्डन' खुलं झालंय... ६ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान राष्ट्रपती भवनातला हा फुलांचा उत्सव पाहता येणार आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी या मुघल गार्डनमध्ये फोटोसेशन केलं. 'उद्यानोत्सव' नावानं हा बहरलेल्या फुलांचा सोहळा ओळखला जातो.

आठ विविध रंगांमध्ये फुललेली 'ट्युलिप्स' हे यंदाच्या वर्षीच्या उद्यानोत्सवाचं आकर्षण असणार आहे. साधारणपणे जानेवारीपासून 'ट्युलिप्स'चा सिझन सुरू होतो. 


राष्ट्रपती भवनात उद्यानोत्सव

लाल, पांढरी, पिवळी, जांभळी, गुलाबी रंगांची ही ट्युलिप्स नेदरलँडसहून आणण्यात आलीत. ट्युलिप्स वगळता मुघल गार्डनमध्ये फुलांच्या ७० जाती आहेत. ५० प्रकारची बोन्साय, १३५ जातींचे गुलाब, हिरवा गुलाब आणि काळा गुलाबही या मुघल गार्डनमध्ये पाहायला मिळतो.

१५ एकरांवर फुललेलं हे मुघल गार्डन १९१७ मध्ये सर एडविन ल्युटेन्स यांनी साकारलंय. मुघल गार्डन पाहण्यासाठी ९ मार्चचा दिवस हा विशेष करुन शेतकरी, दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. पुढचा महिनाभर बहरलेल्या फुलांचा हा सोहळा अनुभवता येणार आहे.