नवी दिल्ली : राज्यसभा सदस्यपदाची शपथ उदयनराजे भोसले यांनी घेतली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करणार असल्याच्या भावना उदयनराजे यांनी व्यक्त केल्या. तर कोरोनावर लवकरात लवकर लस निघणं गरजेचे असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
उदयनराजे कोरोनावर बोलताना म्हणाले, कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे लॉकडाऊन मुळे लोकांच्या नोक-या गेल्या, आता किती दिवस सांगणार लोकांना घरात बसून राहा.
उद्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल.
दरम्यान राममंदिरावर देखील उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राम मंदिर मुद्द्यावरून वाद उकरू नये, देशात सर्व जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे, प्रत्येकाला आपल्या विचाराचे स्वतंत्र आहे.
आपल्या राजकीय सेवेविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले, मागील तीस वर्षात जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ सातारा नाही तर महाराष्ट्रासाठी काम करत राहीन.लोकांना केंद्रबिंदू म्हणूनच काम केलंय. आत्तापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीच केले नाही.