पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.

Updated: Jul 30, 2017, 04:19 PM IST
पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान  title=

पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. आबिद मंजूर आणि इरफान शेख अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं असून त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची ओळखपत्र मिळालीत. तसेच एक एसएलआर आणि रायफल जप्त करण्यात आलंय.

पुलवामामधील तहाब भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार रात्रीपासूनच या दहशतवाद्यांचा शोध सुरु होता. या शोधकार्यादरम्यान सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.

दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसं उत्तर दिलं. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय. तहाब परिसरात जवानांकडून सर्च ऑपरेशन जारी आहे. कारवाईदरम्यान इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.