मुंबई : भारतातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन ट्रूकॉलरने कोविड हॉस्पिटलाची डायरेक्टरी सुरू केली आहे. या डायरेक्टरीच्या माध्यमातून भारतीय युजर्सना कोविड रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता याविषयी माहिती मिळणार आहे. खास गोष्ट म्हणजे यासाठी युजरला स्वतंत्रपणे मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागणार नाही. ट्रूकॉलर अॅपच्या मेनूवर जाऊन युजर डायरेक्टरीमधून माहिती मिळवू शकतात.
Truecaller ने म्हटले आहे की, कोविड डायरेक्टरीत सरकारच्या डेटाबेसमधून घेतलेल्या देशभरातील अनेक राज्यातील कोविड रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते आहेत. पण यामध्ये रुग्णालयात बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळणार नाही.
Truecaller इंडियाचे एमडी रिषीत झुंझुनवाला म्हणाले की, आम्ही भारतीय युजर्सच्या सोयीसाठी ही सुविधा सुरू केली आहे. यामध्ये त्यांना कोविड रुग्णालयांचे फोन नंबर व पत्त्याची माहिती मिळेल. ते पुढे म्हणाले की आम्ही या डायरेक्टरीवर काम करत आहोत आणि लवकरच त्यात इतर कोविड रुग्णालयांची संख्या वाढवू.'
गेल्या वर्षी कंपनीने कॉलर आयडी फीचरला अपडेट करत त्यामध्ये कॉल रीजन फीचर जोडले होते. या फीचरच्या माध्यमातून यूजर्स कॉल करताना कॉलचा हेतू देखील सेट करु शकत होता. ज्यामुळे कॉल उचलणाऱ्या व्यक्तीला त्याची माहिती मिळायची. की हा फोन का केला गेला आहे.
जेव्हा जेव्हा कोणी कॉल करतो, तेव्हा कॉलचे कारण देखील दिसून येईल. पण कॉल करण्यापूर्वी त्या युजरने ते लिहिले पाहिजे.