Viral Video : भारताची राजधानी दिल्लीमधील (Delhi ) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतो आहे. पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी असतात. पण जर पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात असेल तर आपण कोणाजवळ जाणार? असाच काहीसा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे दिल्ली पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता थेट पोलीस स्टेनशच्या आत पोलिसाच मारलं जातं आहे. लोकांचा एकच घोळका या पोलिसांला घेरून अमानुष प्रकारे मारत होते. विशेष म्हणजे या पोलिसाच्या सुरक्षेसाठी कोणीही पुढे आलं नाही. या व्हिडीओमध्ये तुम्हाला ऐकू येत असेल की पोलीस मारपीट करण्याची माफी मागत आहे आणि आपल्याला सोडून देण्याची विनंती करतो आहे. (trending video viral video cop beaten up inside police station in delhi anand vihar in marathi)
चौकशीदरम्यान हा व्हिडीओ दिल्लीतील आनंद विहार पोलीस स्टेशनमधील आहे, असं समोर आलं आहे. धक्कादायक गोष्टी पोलीस कर्मचाऱ्याला मारपीट होत असताना इतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. व्हिडीओमधील कर्मचारी हा आनंद विहार पोलीस स्टेशनचा हेड कॉन्स्टेबल प्रकाश आहे. ही घटना 3 ऑगस्टची आहे अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली डीसीपींनी या घटनेची नोंद घेतली असून आरोपींवर कठोर कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हा व्हिडीओ पाहून जिथे पोलीसच सुरक्षित नाही, एका पोलिसाला मारहाण सुरु असताना इतर पोलीस बघ्याची भूमिका घेतात. तिथे सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित राहिल असा प्रश्न यूजर्सने उपस्थित केला आहे. आरोपींना आता खाकी वर्दीचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न लोकांना पडतो आहे.
थाने के अंदर पुलिस वाले की पिटाई, मांगता रहा माफी; वीडियो में थप्पड़ मारते दिखे लोग @NeerajGaur_ #Delhi pic.twitter.com/UTyCzZDEbZ
— Zee News Crime (@ZeeNewsCrime) August 6, 2022