शाळेत मुलाने काढलं असं चित्र, पाहून शिक्षकांना फुटला घाम... तात्काळ पालकांना बोलावलं

शाळेत शिक्षकाने मुलांना चित्र काढायला सांगितलं. पण एका विद्यार्थ्याने काढलेलं चित्र (Drawing) पाहून शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं.

राजीव कासले | Updated: May 10, 2023, 09:08 PM IST
शाळेत मुलाने काढलं असं चित्र, पाहून शिक्षकांना फुटला घाम... तात्काळ पालकांना बोलावलं title=

Shocking News : लहान मुलं नेहमी मोठ्यांचं अनुकरन करत असतात.आपल्या घरात जसं वातावरण असतं तेच परिणाम मुलांवर होतात. त्यातच आता मोबाईलमुळे (Mobile) मुलांना जगभरातील सर्व गोष्टी एका क्षणात पाहिला मिळतात. पण मोबाईलवर आपली मुलं काय पाहातात, काय खेळतात याकडे पालकांनी (Parrents) कटाक्षाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

शिक्षकांना फुटला घाम
एका शाळेत शिक्षकाने मुलांना आपल्या कुटुंबाचं चित्र (Drawing) काढायला सांगितलं. सर्व मुलांनी आपल्यालाल जमतील तशी चित्र काढली. मुलांनी काढलेली चित्र तपासत असताना एका विद्यार्थ्याचं चित्र पाहून शिक्षकांना घामच फुटला. हे चित्र शिक्षकाने तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांना दाखवला. चित्र पाहून मुख्याध्यापकही घाबरले आणि त्यांनी तात्काळ मुलाच्या पालकांना तातडीने शाळेत बोलावून घेतलं. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. 

पालकांना शाळेत बोलावलं
लहान मुलं निरागस असतात. आपल्या समोर जे दिसतं त्या आधारे ते आपल्या वागण्या-बोलण्यात अनुकरन करत असतात. पण शाळेत त्या मुलाने जे चित्र काढलं ते शिक्षकांच्या समजण्याच्या पलीकडे होतं. मुलाने हे चित्र नेमकं का काढलं, याचं उत्तर शोधण्यासाठी शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलावलं. 

'शिक्षकांना चित्र आवडलं नाही'
शाळेत घडलेला हा संपूर्ण प्रकार त्या सहा वर्षीय विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आपल्या फेसबूकवर शेअर केला आहे. आपला सहा वर्षांचा मुलगा शाळेतून घरी आला आणि त्याने आईच्या हातात एक पत्र ठेवलं. यात लिहिलं होतं, उद्या शाळेत येऊन तात्काळ मुख्याध्यापकांची भेट घ्यावी. याबाबत आई-वडिलांनी मुलाला शाळेत नेमकं काय घडलं याबाबत विचारलं. तेव्हा मुलाने शिक्षकांना माझं चित्र आवडलं नाही इतकंच सांगितलं. 

चित्र नेमकं काय होतं?
शाळेतून बोलावल्यानुसार त्या मुलाची आई शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटली. मुख्याध्यापकांनी मुलाने काढलेलं चित्र त्याच्या आईसमोर ठेवलं आणि याबाबत विचारणा केली. पण ते चित्र पाहून मुलाच्या आईच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव उमटले नाहीत. उलट तीने यात काय चूक आहे अशी विचारणा शिक्षक आणि मुख्याध्यापकांना केली. हे चित्र आमच्या फॅमेली व्हेकेशनचं असल्याचं तीने सांगितलं. आई-वडिल आणि दोन मुलं समुद्राच्या खोल पाण्यात उतरले असून त्यांनी स्नॉर्कलिंग म्हणजे तोंडाला ऑक्सीजनची नळकांडी लावल्याचं या चित्रात मुलाने दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शिक्षकांना त्या चित्रामागचा अर्थ कळला.

शिक्षकांचा काया समज?
खरतर हे चित्र पाहिल्यानंतर कुटुंबाने गळ्यास फास लटकावल्याचा भास होत होता, जे खूपच चिंताजनक आणि भीतीदायक होतं. मुलाने हा प्रकार नेमकी कुठे पाहिला असावा, त्याने असं चित्र का काढलं असावं असे अनेक प्रश्न शिक्षकांच्या मनात घोंघावू लागले. त्यामुळेच त्यांनी मुलाच्य पालकांना तात्काळ शाळेत बोलावून घेतलं. अखेर यावर समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला.