Optical Illusion: एकूण 13 घुबडं त्यात 12 नकली...एकच खरा, शोधून दाखवा; ओप्पन चॅलेंज!

Optical Illusion mind game: कधीकधी आपल्याला सहज दिसणार्‍या गोष्टी इतर लोकांना दिसत नाहीत. समान गोष्टींच्या संयोजनामुळे वस्तू शोधणे सोपं नाही. 

Updated: Nov 17, 2022, 01:42 AM IST
Optical Illusion: एकूण 13 घुबडं त्यात 12 नकली...एकच खरा, शोधून दाखवा; ओप्पन चॅलेंज! title=
Optical Illusion Owl

Optical Illusion Owl:  प्रत्येकाला ऑप्टिकल इल्युजन असलेली चित्रे आवडतात. अशा चित्रांमुळे मनाचा व्यायाम तर होतोच शिवाय एकाग्रताही वाढते. आम्ही अनेकदा तुमच्यासाठी अशी छायाचित्रे (Optical Illusion Photo) घेऊन येतो, ज्यावरून तुम्ही कोणतेही काम करताना किती लक्ष केंद्रित करता हे दर्शवितं. आज आम्ही तुमच्यासाठी जे छायाचित्र घेऊन आलो आहे, त्यात एक घुबड (owl) लपला आहे, ज्याचा शोध घेणं लोकांसाठी कठीण झालंय. (trending latest optical illusion of owl mind game)

कधीकधी आपल्याला सहज दिसणार्‍या गोष्टी इतर लोकांना दिसत नाहीत. समान गोष्टींच्या संयोजनामुळे वस्तू शोधणे सोपं नाही. सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला एखादे भयानक पक्षी सहजासहजी सापडणार नाही.

इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या चित्रात घुबड कुठे आहे हे लोकांना शोधता येत नाही. घुबड शोधण्यासाठी, आपल्याला चित्राकडे बारकाईने पहावे लागेल. घुबड (Optical Illusion Owl) आपल्या समोर हजर असतो, पण तुम्हाला सापडणार नाही... लावा डोकं!

पाहा उत्तर -

Owl

दरम्यान, सापडत नसेल तर राहूद्या, चित्रात एकूण 13 घुबडं त्यात 12 नकली आहे. तर 1 च खरा घुबड आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही एवढी घडपड करताय, त्याचं उत्तर  (Optical Illusion Owl) वरच्या फोटोमध्ये तुम्हाला पहायला मिळेल.