Trending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?

Travel News : बाहेर फिरायला गेल्या अनेकांना ही समस्या येते...आपण हॉटेल कुठे आहे हे विचारतो आणि लोकं आपल्याला रेस्टॉरंटकडे हात दाखवतात.  हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमध्ये फरक असतो. तो तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Jan 30, 2023, 12:56 PM IST
Trending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?  title=
Travel Trending News Do you know hotel motel restaurant resorts and Dhaba difference

Travel : चला बाहेर जेवायला जाऊयात...असं म्हटलं जातं मग कुठल्या हॉटेलला जायचं. हे खूप साधारण वाक्य आहे. पण हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये अनेकांचा गोंधळ होता. या गोंधळामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागला आहे. ही समस्या अनेक वेळा पर्यटनासाठी जेव्हा बाहेर गावी जातो तेव्हा होते. आपण लोकांना जेव्हा विचारतो हॉटेल कुठे आहे तर ते आपल्या समोर जा तिथे मिळतील दोन तीन हॉटेल...पण तिथे गेल्यावर तसं काही नसतं...तिथे दिसतात ती खाण्यापिण्याची दुकाने...अगदी अनेक ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील फरक माहिती नसल्यामुळे मालक सर्रास हॉटेल असं लिहितात. त्यामुळे आज आपण हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमधील फरक जाणून घेणार आहोत.  (Travel Trending News Do you know hotel motel restaurant resorts and Dhaba difference)

रेस्टॉरंट (Restaurant) 

पहिले आपण रेस्टॉरंटबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या ठिकाणी फक्त जेवण्याची सोय असते किंवा तिथे जेवण्याचं पार्सलदेखील मिळतं. त्या जागेला रेस्टॉरंट असं म्हणतात. ही जागा शहरात अनेक ठिकाणी लहान मोठी स्वरुपात असतात. 

हॉटेल (Hotel)

हॉटेल याबद्दल जाणून घेऊयात...तर आपण सर्रास रेस्टॉरंटला हॉटेल म्हणतो. पण थांबा जिथे राहण्याची सोय असते त्याला हॉटेल म्हणतात. हॉटेलमध्ये तुमच्या राहण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा असतात. टीव्हीपासून रुम सर्व्हिस पर्यंत...यात पण एक गोष्ट आहे...ज्या हॉटेलमध्ये जितक्या जास्त आणि चांगल्या सुविधा त्यानुसार त्याला ग्रड दिला जातो. म्हणजे टू स्टार, थ्री स्टार, फोर स्टार, फाइव्ह स्टार आणि सेव्हन स्टार अशी ही हॉटेल असतात. 

मॉटेल (Motel) 

खरं हा शब्द मोटर (Motar) आणि हॉटेल (Hotel) यापासून बनला आहे. ही संकल्पना हायवेवर पाहिला मिळते. रस्त्याने लांबचा प्रवास करताना चालकांना आरामासाठी हायवेवर जी जागा असते त्याला मॉटेल (Motel)  म्हटलं जातं. म्हणजेच तुमच्या गाडीला आणि तुम्हाला आराम करण्याची जागा... मॉटेल (Motel) हे खास करुन पदेशात जास्त दिसतात. या ठिकाणी फक्त राहण्याची सोय असते. 

रिसॉर्ट (Resort) 

रिसॉर्ट हे असं ठिकाण आहे जिथे निसर्गरम्य जागा, प्रशस्त राहण्याची सोय, मनोरंजनाच्या सुविधा, स्विमिंग पूल, जिम, स्पासारख्या लग्झरी सुविधा असतात. एखाद्या ठिकाणी फक्त दोन तीन दिवस निवांत राहण्यासाठी विकएंडला जाण्याची ही जागा असते. 

ढाबा किंवा धाबा (Dhaba)

महामार्गावर ट्रक चालकांसाठी कमी पैशांत खाण्यापिण्याची आणि अगदी झोपण्याची सोय असणारी जागा म्हणजे ढाबा...हा एक देशी प्रकार आहे जो धाबा किंवा ढाबा या शब्दाने ओळखला जातो. भट्टीवरील जेवण तेही खाटेवर खाण्याची जी मजा काही औरच आहे. पंजाबकडे जाताना मोठ्या प्रमाणात असे ढाबे दिसतात. पंजाबी ढाबे हे अनेक चित्रपटातही दाखविण्यात आले आहेत. भारतात असंख्य ढाबे आहेत. या ढाबावरील दालतडका आणि लस्सी हे पंजाबी पदार्थ खूप फ्रेमस आहेत. हे ढाबे चोवीस तास सुरु असतात. रात्रीच्या वेळी प्रवास करण्यासाठी एक भूक लागल्यानंतरचं उत्तम ठिकाण असतं. अगदी रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल बसे प्रवाशांना फ्रेश होण्यासाठी आणि जेवण्यासाठी ढाब्यावर थांबतात.