PK Rosy Controversy: आज चित्रपटसृष्टीत नायकासोबतच नायिकाही मोठ्या आत्मविश्वासानं मोठंमोठं सिनेमे करताना दिसत आहेत. आज अगदी रश्मिका मंदाना, साई पल्लवी, समांथा रूथ प्रभुसारख्या (Rashmika Maddana) दाक्षिणात्त्य अभिनेत्री फार सन्मानानं आज चित्रपटसृष्टीत आपलं पाय रोवून आहेत परंतु आज ज्या आत्मविश्वानं त्या सिनेमांमधून काम करत आहे त्याप्रमाणेच त्यांच्यापुर्वी आलेल्या अभिनेत्रींना करायला मिळालं नाही. त्यांना अत्यंत संघर्षातून जावे लागले आहे. केवळ त्यांच्यामुळे आज या अभिनेत्री जे काही काम करत आहेत ते शक्य झाले आहे त्या वेळी त्यांच्या आयुष्यात तो संघर्ष (Struggle Story of PK Rosy) झाला नसता तर आजच्या अभिनेत्रींना तेवढी मोकळीकही मिळाली नसती. या अभिनेत्रींची दखल खुद्द गुगलनंही घेतली आहे. ही अभिनेत्री मल्ल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री होती. (today google doogle about p k rosy goes viral read her full struggle story from a backward caste girl to 1st malayalam movie actress 120th birth anniversary)
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतो आहोत त्या मल्ल्याळम अभिनेत्रीचे नावं आहे पी.के.रोझी. या एक मागासवर्गीय समाजातल्या होत्या. त्यांना चित्रपटांमध्ये हिरोईन होण्याची इच्छा होती. आज त्याची 120 वी जयंती आहे. 1903 साली त्यांचा जन्म झाला. पीके रोझी उर्फ राजम्मा असे त्यांचे नावं होते. त्यांचा जन्म हा नंदकोडे येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबियांना तलाव, विहिरी आणि मंदिराजवळ जाऊ दिले जात नव्हते. त्यांना आपल्या रोजी रोटीसाठी कुटुंबकबिल्यासह घरही सोडून जावे लागले. त्यांनी जेव्हा चित्रपटातून कामं करायला सुरूवात केली तेव्हा खालच्या जातीची मुलगी चित्रपटाची नायिका कशी होऊ शकते यावर लोकांनी त्यांना भरपूर त्रास द्यायला सुरूवात केली होती. त्यांना लोकांकडून अनेक नानाविध अपशब्द ऐकावे लागले होते. परंतु या सगळ्यावर मात करत त्या भारतातील पहिल्या मल्ल्याळम अभिनेत्री झाल्या.
रोझी यांच्या वडिलांचे लहानपणीचं निधन झाले. त्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या पोटापाण्यासाठी गवत विकावे लागायचे. असं करून त्यांनी आपली धाकटी बहीण आणि आपल्या आईची जबाबदारी उचलली. परंतु त्यांनी नटी बनायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या काकांच्या मदतीनं आर्ट स्कूलमध्ये नृत्य आणि अभिनय प्रशिक्षण घेतले. तिथे त्या नृत्य आणि अभिनय शिकल्या. परंतु हा मार्ग इतका सोप्पा नव्हता. त्यांना समाजाचे टोमणे ऐकावे लागत होते. त्यांच्या आजोबांनी त्यांना घराबाहरे हकलून दिले. एके दिवशी जेसी डॅनियल यांनी त्यांना आपल्या चित्रपटाची नायिका बनवायचे ठरविले.
रोझी यांची पहिली फिचर फिल्म विगाथाकुमारम ही 23 ऑक्टोबर 1928 साली कॅपिटल थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती. परंतु तरी त्यांना अन्नाला हात लावयची इतरांसोबत बसून जेवायचीही परवानगी नव्हती. सर्वांनी त्यांचा चित्रपट पाहण्यास नकार दिला होता. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शकानंही रोझी यांनी चित्रपटगृहात जाण्यास नकार दिला. तेव्हा त्या बाहेरच उभ्या राहिल्या.
जेव्हा चित्रपटात एक अभिनेता रोझी यांच्या केसात फूल घालतो हे पाहून प्रेक्षक संतापले आणि त्यांनी रोझी यांच्यावर हल्ला करायला सुरूवात केली. त्यावेळी लोकं अक्षरक्ष: पेटली होती त्यांनी रोझी यांच्यावर हल्ला करायचे ठरविले. त्यानंतर रोझी यांच्यावर लोकांनी हल्लाबोल चढविला होता. त्यामुळे रोझी लपूनही बसल्या परंतु त्यांना कोणीही मदत करायला आले नाही. शेवटी केशवा पिल्लई नामक एका व्यक्तीनं त्यांना सोडवून आणले आणि मग त्यानंतर त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1987 साली त्यांचे निधन झाले.