मुंबई: भारतीय बाजारपेठेत मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Rate) किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरात काहीसा फरक दिसून आलेला नाही. परिणामी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 48,180 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 52,580 रूपये आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
गेल्या २४ तासांत भारतातील विविध शहरात सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आले. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचे दर 52,610 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,140 रुपये आहे. तर दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 52,690 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 48,300 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 52,530 रुपये आहे. तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 48,150 रुपये आहे. दुसरीकडे, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 52,530 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 48,150 रुपये आहे.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.