हैदराबाद : जगात अशा काही घटना नेहमी घडत असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते मात्र त्या खऱ्या असतात. अशीच एक घटना हैदराबादमधून समोर आलीये. ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
हैदराबादच्या फलकनुमा परिसरात राहणाऱ्या तीन वर्षांच्या अहानाला एक विचित्र आजार झालाय. या आजारावर कोणीच उपचार करु शकत नाहीये. देशातील अनेक दिग्गज डॉक्टरही यावर उपचार करु शकत नाहीये.
अहानाच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत तर रक्त वाहतं. अहाना जेव्हा २० महिन्यांची होती तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू नव्हे तर रक्त वाहत असे.
अहानाच्या या आजाराबाबत डॉक्टरांनाही अद्याप काही निदान करता येत नाहीये. अहानाला हेमॅटोड्रोसिस नावाचा आजार असल्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जातेय. दरम्यान, उपचारानंतर रक्त वाहण्याचं प्रमाण कमी झालंय.
Hyderabad: Three-year-old Ahana cries tears of blood,terrifies parents and doctors pic.twitter.com/WqK1rgNcFV
— ANI (@ANI_news) July 8, 2017