जम्मू-काश्मिरात तीन दहशतवाद्यांना खात्मा, एक जवान शहीद

 जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर लष्कराचा एक जवानही यात शहीद झालाय. 

PTI | Updated: Nov 27, 2018, 10:45 PM IST
जम्मू-काश्मिरात तीन दहशतवाद्यांना खात्मा, एक जवान शहीद title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर लष्कराचा एक जवानही यात शहीद झालाय. पुलवामामध्ये आयसिसची संलग्न संघटना असलेल्या अन्सार गुझ्वातुल हिंद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी मारला गेलाय. 

 

तर कुलगामच्या रेडवानी भागात लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला. लष्करानं राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये अतिरेक्यांचा तळ लष्करानं नेस्तनाबूत केला. यात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.