या 3 बँकांच्या सेव्हिंग अकाऊंटवर मिळत आहे 7% हून अधिक व्याज

तुमचं सेव्हिंग अकाऊंट कोणत्या बँकेत आहे. यावर ही बातमी अवलंबून आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 19, 2017, 04:48 PM IST
या 3 बँकांच्या सेव्हिंग अकाऊंटवर मिळत आहे 7% हून अधिक व्याज  title=

मुंबई : तुमचं सेव्हिंग अकाऊंट कोणत्या बँकेत आहे. यावर ही बातमी अवलंबून आहे. 

तुमच्या सेव्हिंग अकाऊंटवर तुम्हाला किती इंटरेस्ट रेट मिळतो याची आपल्याला कधी कल्पना असते का?  ही माहिती आपल्याला असणं सर्वाधिक महत्वाची आहे. प्रमुख बँकांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या बँका एकसारखंच व्याज देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI बद्दल बोलायचं झालं तर सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमा असलेल्या पैशांवर 3.5 टक्के व्याज मिळतं. जर तुमच्या बँकेत 1 करोडपेक्षा अधिक रुपये जमा असतील तर तुम्हाला 4 टक्के व्याज मिळू शकेल. यासोबतच एका वर्षाच्या फिक्स डिपॉझिटवर एसबीआय 6.25 टक्के व्याज दर देत आहे. 

जर तुम्हाला देखील जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळवायचा असेल तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकांमध्ये पैशे जमा करा. जास्त व्याज देणाऱ्या बँकांमध्ये फिनकेअर, इएसएएफ आणि उत्कर्ष बँकांचा समावेश आहे. पुढील महत्वपूर्ण माहिती वाचा, या बँका तुम्हाला देतील 7 टक्क्यांहून अधिक व्याज दर 

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत सेव्हिंग अकाऊंट असल्यास 1 लाख रुपयांपर्यंतच्या राशीवर तुम्हाला 6 टक्के व्याजदर मिळणार आहे. जर ही रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर बँक तुम्हाला 7 टक्के व्याजदर दरवर्षी मिळणार आहे. या बँकेचे ऑफिस गुजरातमध्ये आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही या बँकेत एका वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर तुम्हाला 8 टक्के व्याजदर मिळेल. सिनिअर सिटीझनला 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. दोन वर्षासाठी एफडी केल्यास 9 टक्के व्याज मिळेल. 

इएसएएफ स्मॉल फायनान्स बँक 

इएसएएफ स्मॉल फायनान्स बँक 1 लाख रुपये जमा असलेल्या राशीवर 4 टक्के व्याज मिळात आहे. जर तुमची जमा राशी ही 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला व्याज 6.5 व्याज मिळालं आहे. 10 लाख रुपयांहून अधिक राशी असेल तर 7 टक्के व्याज मिळेल. आणि एफडी असेल तर 9 टक्के व्याज मिळेल. आणि सिनिअर सिटीझनला 9.5 टक्के व्याज मिळेल. 

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 

या बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये 6 टक्के वर्षाला व्याज मिळतं. त्यासोबतच फिक्स डिपॉझिटमध्ये 8 टक्के व्याज मिळेल. आणि सिनिअर सिटिजनला 8.5 टक्के व्याज मिळेल.