एका नाण्याच्या बदल्यात कमवा 5 लाख रुपये, फक्त तुमच्याकडे 'हे' नाणं हवं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

असे लोक तुम्हाला नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देऊ शकतात. 

Updated: Sep 14, 2021, 12:51 PM IST
एका नाण्याच्या बदल्यात कमवा 5 लाख रुपये, फक्त तुमच्याकडे 'हे' नाणं हवं, जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : आपल्याकडे घरी अशी अनेक नाणी पडलेली असतात जी सध्या चलनात चालत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे अशा नाण्यांना बाजारात जास्त पैसे देऊन देखील लोकांकडून विकत घेतले जात आहे. एवढेच काय काही चलनात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या नाण्याला त्याच्या खऱ्या मुल्यापेक्षा जास्त पैसे देऊन विकत घेतले जात आहे. अशी नाणी विकून तुम्ही 5 लाख रुपयापर्यंत मिळवू शकतात.

त्या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात भारताचा नकाशा बनवलेला हवा. ते नाणे सहसा दिसत नाही, पण ते बऱ्याच लोकांच्या घरात पडलेले असावे. कदाचित तुमच्याकडेही असे नाणे पडलेले असावे, त्यामुळे असे नाणे जत तुमच्याकडे असेल तर लगेच शोधून काढा कारण त्यामुळे तुम्ला लाखो रुपये मिळू शकतात.

जेव्हा तुम्ही बऱ्याचदा अशा बातम्या वाचल्या असतील तेव्हा तुमच्या मनात असा विचार आला असावा की, अशी नाणी कोण आणि का विकत घेतील? आणि ते ही इतक्या जास्त पैशात. तर लोकं हे त्यांच्या छंदासाठी करतात. ते म्हणतात ना 'शौक बडी चीज है' त्यामुळेच लोकं जास्त पैसे देऊन अशा वस्तु विकत घेतात आणि त्याचा संग्रह करतात.

त्यासाठीच ते अशा नाण्यांसाठी खूप पैसे खर्च करण्यास तयार असतात. असे लोक तुम्हाला नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देऊ शकतात. आपल्याला फक्त त्याचे योग्य व्यासपीठ आणि योग्य मार्ग माहित असणे आवश्यक आहे.

नाणे कसं असावं?

वास्तविक, देशी आणि विदेशी अशा सर्व प्रकारची अनेक नाणी आहेत, जी अनेक वर्षांपूर्वी बंद झाली आहेत आणि ही नाणी आता दिसत नाहीत. ज्या नाण्याबद्दल आपण इथे बोलत आहोत त्याचे वेगळेपण आहे, त्यामागे असलेला भारताचा नकाशा आहे. होय, भारताच्या नकाशासह एक नाणे तुम्हाला पूर्ण 5 लाख रुपये मिळवू शकते.

ज्या नाण्याचा तपशील ई-कॉमर्स वेबसाईट क्विकरवर देण्यात आला आहे, ते 2 रुपयांचा नाणं आहेत आणि त्यांच्या पाठीमागे भारताचा नकाशा बनवण्यात आला आहे. ही नाणी 1990, 1992, 1994 आणि इतर वर्षांमध्ये बनवलेली नाणी आहेत. अशा अनोख्या नाण्यांची विक्री क्विकरवर सुरू आहे.

या विशेष नाण्याच्या पाठीमागे भारताचा नकाशा आणि त्या नकाशात राष्ट्रध्वज आहे. इंग्रजीमध्ये National Integration आणि हिंदीमध्ये राष्ट्रीय एकात्मता त्याच्या पुढे छापलेले असले पाहिजे.

नाणी कशी विकावी?

जर तुमच्याकडे अशी दुर्मिळ नाणी असतील, तर तुम्ही ती ऑनलाईन वेबसाइटवर सहज विकू शकता. यासाठी तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल. यानंतर, दोन्ही बाजूंच्या नाण्याच्या फोटो क्लिक करा आणि ते फोटो साईटवर अपलोड करा. खरेदीदार तुमच्याशी स्वतः संपर्क साधतील आणि तुम्ही परस्पर संमतीने उच्च किमतीत नाणी विकू शकता.

(ही बातमी विविध स्त्रोतांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे. 24taas.com कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही.)