एअर इंडियाचा दिवाळी सेल; ९९९ रुपयांत करा तिकीट बुक

दिवाळीच्या मुहूर्तावर खास ऑफर

Updated: Oct 20, 2019, 06:21 PM IST
एअर इंडियाचा दिवाळी सेल; ९९९ रुपयांत करा तिकीट बुक title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : विमान कंपनी एअर इंडियाकडून (Air India) दिवाळीच्या मुहूर्तावर खास सुविधा देण्यात आली आहे. एअर इंडियाने दिवाळी सेल २०१९ (Diwali Sale 2019) सुरु केला आहे. या सेलमध्ये ९९९ रुपयांत तिकीट बुक करुन दिवाळीत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

एअर इंडियाकडून सुरु करण्यात आलेल्या दिवाळी सेलअंतर्गत प्रवाशांना २० ऑक्टोबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत तिकीट बुक करता येऊ शकते. तिकीट बुक केल्यानंतर या प्रवाशी २७ आणि २८ ऑक्टोबरला प्रवास करु शकतात. 

एअर इंडियाची ही दिवाळी सेल ऑफर केवळ डोमॅस्टिक मार्गांवरच उपलब्ध आहे. या ऑफरअंतर्गत प्रवाशांना एअर इंडियाच्या वेबसाइट आणि अॅपद्वारेही तिकीट बुकिंग करता येऊ शकते.