हे आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट

ट्रिपल तलाकवरुन गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला. यादरम्यान आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांबद्दलची माहिती देत आहोत.

Updated: Aug 22, 2017, 09:56 PM IST
हे आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट title=

नवी दिल्ली : ट्रिपल तलाकवरुन गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निर्णय दिला. ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी न्यायालयाने दिला. यादरम्यान आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांबद्दलची माहिती देत आहोत.

पती आणि पत्नी यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर पतीला कायद्यानुसार पत्नीला पोटगी द्यावी लागते. जगात असे काही घटस्फोट आहेत ज्यात पोटगी म्हणून इतकी भलीमोठी रक्कम दिली गेली की ती चर्चेचा विषय ठरली होती. 

हे आहेत जगातले महागडे घटस्फोट

रूपर्ट मर्ढोक-अॅना टॉर्व

मीडियाचे बादशाह रुपर्ट मर्ढोक यांनी १९९९मध्ये आपली दुसरी पत्नी अॅना टॉर्व हिला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून तब्बल ८ हजार ६७० कोटी रुपये दिले होते. 

बर्नी-स्लाविका 

फॉर्म्युला वनचे बॉस बर्नी आणि त्यांची पत्नी स्लाविका यांच्या घटस्फोटानंतर स्लाविका यांना मिळालेल्या पोटगीमुळे त्या सर्वात श्रीमंत घटस्फोटित महिला बनल्या होत्या. स्लाविका यांना पोटगी म्हणून तब्बल १.२ बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ७७ अब्ज रुपये देण्यात आले होते. 

हॉलीवू़ड अभिनेता अर्नोल्ड - मारिया

हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्डने २०११मध्ये पत्नी मारियाला घटस्फोट दिला होता. यावेळी पोटगी म्हणून मारियाला ९०० मिलियन अमेरिकन डॉलर देण्यात आले होते. 

गोल्फर टायगर वुड्स- अॅलिन

प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्सने सहा वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पत्नीला घटस्फोट दिला होता. यावेळी टायगरला आपल्या पत्नीला पोटगी म्हणून १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६३७ कोटी रुपये द्यावे लागले होते. 

बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन - जुआनिता वॅनॉय 

बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन आणि जुआनिता वॅनॉय यांनी सहमतीने वेगळे व्हायचे ठरवले होते. यावेळी जॉर्डनने आपल्या पत्नीला पोटगी म्हणून ७६५ कोटी रुपये दिले होते. 

बॉलीवूडमधील महागडे घटस्फोट

अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खान यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाने बॉलीवूडमध्ये खळबळ माजली होती. २०००मध्ये या दोघांच लग्न झालं होत. यावेळी सुझानने पोटगी म्हणून ऋतिककडून ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर सुझानला ३८० कोटी रुपये पोटगी म्हणून देण्यात आले. 

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा घटस्फोटही बॉलीवूडमधील महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो. या दोघांनी १९९१मध्ये लग्न केले होते. त्यावेळी सैफ अमृतापेक्षा १३ वर्षांनी लहान होता. तेरा वर्षांनी सैफ आणि अमृता वेगळे झाले. दरम्यान, सैफने पोटगी म्हणून अमृताला किती रक्कम दिली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सैफने अमृताला आपली संपत्ती दिली जात असल्याचे वृत्त त्यावेळी आले होते.