मुंबई : सण आणि लग्नसराईचा हंगाम पाहता सरकार लोकांना सतत सावध करत आहे. असे असूनही, दिवाळीपूर्वी नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जात आहेत आणि या काळात कोरोना प्रोटोकॉलचा त्यांना विसर पडला आहे. अशीच परिस्थिती शनिवार आणि रविवारी पाहायला मिळाली.
दिल्लीपासून - मुंबईपर्यंत अशीच स्थिती आहे. मार्केटमध्ये लोक सर्वाधिक खरेदीसाठी जात आहेत. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांना कोरोना प्रोटोकॉलचा विसर पडला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बाजार उघडण्यासाठी परवानगी देताना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या कठोर सूचना दिल्या होत्या, परंतु त्याचा परिणाम कुठेही दिसून आला नाही.
देशात कोरोना लसीचे शंभर कोटींहून अधिक लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने लोकं बिनधास्तपणे बाहेर पडत आहेत. दिवाळी असल्याने बाजारपेठेत गर्दी होत आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने लोकांनी जोरदार खरेदी केली आणि बाजारपेठांमध्ये लोक कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसले.
लोकांनी सावध राहणे आवश्यक
दिवाळीच्या खरेदीत तुम्ही कोरोना देखील घरी तर आणत नाहीत ना याची काळजी घ्या. बाजारपेठा उजळल्या आहेत. दिवाळीसाठीही लोक जोरात खरेदी करत आहेत, पण सणासुदीच्या आनंदात दुसऱ्या लाटेत घेतलेला सावधगिरीचा धडा लोक विसरल्याचे बाजारपेठांमध्ये जमलेली गर्दी सांगत आहे.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात देशाला आतापर्यंत यश आले आहे, मात्र गर्दीच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंतच्या लढ्याचे रूपांतर पराभवात होऊ शकते. राष्ट्रीय राजधानीशिवाय वडोदरातील बाजारपेठांमध्येही गर्दी आहे. इंदूरमध्येही कोरोनाने कहर केला होता आणि आता या इंदूरमधील बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी होत आहे. सणासुदीच्या वेषात ही बेफिकीरता धोका तयार करु शकते.