दबक्या पावलांनी आला आणि साखळी चोरून पळाला; नवऱ्यानं गाडीची किक मारली अन्... पाहा Video

Chain Snatching Video : एका चोराने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली अन् धूम ठोकली. त्यानंतर काय झालं, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 25, 2024, 06:01 PM IST
दबक्या पावलांनी आला आणि साखळी चोरून पळाला; नवऱ्यानं गाडीची किक मारली अन्... पाहा Video title=
Thief Silently Snatching Chain from Women

Chor Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळतंय. बेरोजगारीचं प्रमाण जास्त असल्याने गुन्हेगारी देखील समप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशातच आता तळपायाची आग मस्तकात जाईल अशी घटना समोर आली आहे. एका साखळीचोराने आरामात चोरी केल्याचा एक विडिओ समोर आलाय. यामध्ये चोरट्याने महिलेच्या गळ्यातली साखळी चोरून पळ काढला.

नेमकं काय झालं?

थोडी कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावरुन एक जोडपं आपल्या दोन लहान मुलासोबत दुचाकीवरून जात होतं. गाडीवर नवरा आणि मुलगी बसली होते. तर लहान मुलगा आणि त्याची आई गाडीवर बसत होते. चौघे गाडीवर बसल्यावर बाजूला उभा असलेला चोर सर्वकाही बघत होता. गाडी सुरू करणार तेवढ्यात चोरांने हात साफ केले.

महिला गाडीवर बसल्यावर चोराने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरली आणि पळ काढला. त्यानंतर महिला देखील चोराच्या मागे पळाली पण तिचा तोल गेला आणि ती पडली. त्याचवेळी लहान मुलगा गाडीवर उतरला. नवऱ्याने लहान मुलीला गाडीवरून उतरवलं आणि चोराच्या दिशेने गाडी पळवली. त्याचवेळी महिलेचया आवाजाने काही नागरिक पळत आले आणि चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा video

चोरीच्या घटनेशी संबंधित हा व्हिडिओ  sirsakiaawaz नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी एका क्षणात हिसकावून फरार' असे कॅप्शन लिहिले आहे. अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलंय. तर काहींनी साखळी चोरट्यापासून सावध रहा असा सल्ला दिलाय. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये चोरी करणाऱ्या सोन साखळी , पाकीट मार करणाऱ्या चोरट्यांचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील आजीबाईंच्या गळ्यातील साखळी चोरल्याची घटना समोर आली होती.