मुंबई : फ्लाइटमधील केबिन क्रू नेहमीच शांत, दयाळू, सौम्य आणि मदत करणारे म्हणून ओळखले जातात. जे प्रवाशांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नेहमीच तयार असतात आणि त्यांना मदत करण्यास तयार असतात.पण आज याच केबिन क्रूने विमानातील काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.
द सनच्या बातमीनुसार, पण कधी-कधी असे घडते की त्यांना अनेक प्रकरणांमध्ये थोडे खोटे बोलावे लागते. एका फ्लाइट अटेंडंटने त्यांना प्रवाशांशी खोटे कसे बोलावे लागते याचा खुलासा केला आहे. फ्लाइट अटेंडंटने कन्फेशन्स ऑफ अ ट्रॉली डॉली वेबसाइटवर कबुलीजबाब देताना सांगितले की, फ्लाइट दरम्यान त्यांना अनेकदा हे पाच मोठे खोटे सांगावे लागते.
अधिक माहिती घेऊन येते, पण त्या येतच नाहीत
कोणत्याही प्रवाशाने त्यांच्याकडून कोणतीही माहिती विचारली तर, याबाबतची माहिती घेतल्यानंतर आता तुमच्याकडे परत येते, असे त्यांना म्हणतात. परंतु प्रवाशाच्या सीटवर परतणार नाही हे माहीत असते. यावर कुणी प्रश्नही उपस्थित केला, तर आम्ही हे का करू शकलो नाही, यावर त्यांची अनेक कारण सांगतात.
अनेकदा विमानात बसलेले लोक विमानाच्या विंगवर लागलेल्या गॅफर टॅप, तुटलेले ओव्हरहेड लॉकर, फॉल्टी टॉयलेट, दरवाजे यांच्यामुळे घाबरतात. अनेकदा प्रवास करताना याबाबत प्रश्न देखील विचारतात. अनेकदा क्रू मेंबर हे सगळं ठिक असल्याच सांगतात. आपला विमान प्रवास हा सगळ्यात सेफ असल्याच सांगतात.
अनेकदा तेच प्रवासी आमच्या विमानात अनेकवेळा प्रवास करतात. त्यांच्या आवडीचे पेय आणि स्नॅक्स मागतात, मग आम्ही त्यांना सांगतो की आता राहिले नाही. तुम्ही दुसरे काहीतरी घ्या. जर आपला मूड चांगला असेल तर आपण त्याला त्याच्या आवडीचे काहीतरी देऊ शकतो, परंतु आपण याबद्दल खोटे बोलतो.
कधीकधी विमानात विचित्र आवाज येतो किंवा विचित्र वास येऊ लागतो. मग प्रवासी आम्हाला याबद्दल विचारतात. असे बरेचदा घडते असे आम्ही त्यांना सांगतो आणि आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगतो. पण अनेकवेळा आपणही असा आवाज पहिल्यांदाच ऐकला असतो. आपण आतून घाबरलो आहोत पण तरीही आम्ही कुणाला सांगत नाही. सतत चेहरा हसरा ठेवून घाबरण्यासारखे काही नाही, सर्व काही ठीक आहे. असे सांगत राहायचे.
अनेकवेळा त्या सॉरी देखील म्हणतात. ज्यात त्यांची चूक नाही किंवा केबिन क्रू मेंबरची चूक नाही. पण तरीही त्या त्यांच्याशी संबंधित नसलेल्या चुकीबद्दल माफीही मागतात. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत असले तरी त्यांचीही चिंता कायम आहे.