कानपूर : उत्तर प्रदेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेत तैनात असलेले पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने कानपूर शहरात गंभीर आजारी असलेल्या वंदना मिश्रा यांच्या मृत्यूमुळे माफी मागीतली आहे. राष्ट्रपती यांच्या कानपूर दौऱ्यादरम्यान, रहदारीवर प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे महिला वेळीच रुग्णालयात पोहचू शकली नाही.
वंदना मिश्रा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचे ठरवले होते. कुटूंबिय रुग्णवाहिका घेऊन निघाले परंतु तेव्हाच कानपूरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन झाले. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे ट्रफिक जॅम लागला होता. आजारी महिलेला योग्य वेळात रुग्णालयात पोहचवता आले नाही. ती पोहचली तेव्हा उशीर झाला होता. आणि महिलेचा दुर्दव्याने मृत्यू झाला.
कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरूण यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने कुटूंबियांची जाहीर माफी मागितली आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी कठोर परिश्रम घेऊ असेही म्हटले.
आईआईए की अध्यक्षा बहन वन्दना मिश्रा जी के निधन के लिए कानपुर नगर पुलिस और व्यक्तिगत रूप से मैं क्षमा प्रार्थी हूं। भविष्य के लिए यह बड़ा सबक है। हम प्रण करते हैं कि हमारी रूट व्यवस्था ऐसी होगी कि न्यूनतम समय के लिए नागरिकों को रोका जाए ताकि ऐसी घटनाओं की पुनरावृति न हो।
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) June 26, 2021
जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही 2 अधिकाऱ्यांना त्यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडून महामहिम राष्ट्रपती यांनी व्यक्त केलेला शोक आणि संवेदनासंदेश कुटूंबियांपर्यंत पोहचवण्यात आला.
दरम्यान, या हलगर्जीपणामुळे इन्स्पेक्टर सुशील कुमार आणि अन्य तिघांना निलंबित करण्यात आले आहे.