अटल बिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन... मानसकन्या नमिता यांनी दिला मंत्राग्नी

अटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक मुलगी नमिता कौल - भट्टाचार्य यांनी पूर्ण केले अंत्यविधी

शुभांगी पालवे | Updated: Aug 18, 2018, 08:21 AM IST
अटल बिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन... मानसकन्या नमिता यांनी दिला मंत्राग्नी title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजत राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अखेरचा निरोप देण्यात आला. हिंदू पद्धतीनं वाजपेयींना त्यांची दत्तक मुलगी नमिता कौल - भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला. यावेळी स्मृतीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी, उपराष्ट्राध्यक्ष वेंकैया नायडू, गृहमंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अमित शाह स्मृतीस्थळावर उपस्थित होते. 

दुपारी ५.०० : मानस कन्या नमिता कौल यांनी दिला मुखाग्नी... अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव शरीर पंचत्वात विलीन

दुपारी ४.५५ : अटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक मुलगी नमिता कौल - भट्टाचार्य यांनी पूर्ण केले अंत्यविधी

दुपारी ४.४६ : मंत्रोच्चारात स्मृतिस्थळावर वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू

दुपारी ४.३२ : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव झाकलेला तिरंगा त्यांची नात निहारिका यांच्या हाती देण्यात आला

दुपारी ४.३० : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली

दुपारी ४.२५ : नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी, उपराष्ट्राध्यक्ष वेंकैया नायडू, गृहमंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अमित शाह स्मृतीस्थळावर उपस्थित 

दुपारी ४.१३ : स्मृतीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामण, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अटल बिहारी वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

दुपारी ४.०० : सैन्याच्या तिनही दलानं वाहिली श्रद्धांजली

दुपारी ३.४१ :  स्मृतिस्थळावर ३०० जवानांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना मानवंदना  

दुपारी ३.४० : फुलांनी सजवलेल्या सैन्याच्या ट्रकमध्ये अटलजींचं पार्थिव स्मृतीस्थळावर दाखल

दुपारी ३.३५ : अटल बिहारी वाजपेयींचं पार्थिव स्मृतिस्थळाबाहेर दाखल

दुपारी ३.०० : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अंत्ययात्रेत सहभागी 

दुपारी २.५० : भाजपा मुख्यालयापासून ते स्मृतीस्थळापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी

दुपारी २.४० : संपूर्ण दिल्लीतून आणि देशातून लोक अंत्ययात्रेत होतायत सहभागी 

दुपारी २.३१ : अटलजींच्या अंत्ययात्रेत मोदी, शाहांसोबत संपूर्ण कॅबिनेटच सोबत चालताना दिसत आहेत 

दुपारी २.२० : अटलजींना निरोप देण्यासाठी रस्त्यावरही अलोट गर्दी... अंत्ययात्रेवर नागरिकांकडून फुलांचा वर्षाव 

दुपारी २.०८ : पंतप्रधान नरेंद्र  मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेते अंत्ययात्रेत सहभागी


पंतप्रधान नरेंद्र मोदीही अंत्ययात्रेत सहभागी

 

दुपारी २.०७ : भाजप मुख्यालयाबाहेर अटलजींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी 

दुपारी २.०५ : भाजपच्या मुख्यालयातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात 

भाजप मुख्यालयात अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४.०० वाजता नवी दिल्लीच्या स्मृतीस्थळावर अंत्यसंस्कार पार पडतील. सकाळी ११ च्या सुमारास त्यांचं पार्थिव सरकारी निवासस्थान ६-ए, कृष्ण मेनन मार्गाहून भाजप मुख्यालयता आणण्यात आलं. निवासस्थानाहून भाजप मुख्यालयाकडे निघताना त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर'ही देण्यात आला. यावेळी तीनही दलाचे प्रमुख उपस्थित होते. भाजप मुख्यालयातही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते आणि नागरिक उपस्थित झालेत. 

पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही अटलजींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा - युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासहीत वाजपेयींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी भाजप मुख्यालयात दाखल पोहचलेत. 

मुलायम सिंह यादव, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अटलजींना श्रद्धांजली वाहिली. दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आपचे खासदार संजय सिंग हेदेखील भाजप मुख्यालयात उपस्थित झालेत. 

याशिवाय,  अभिनेत्री हेमामालिनी, सिनेनिर्माता मधूर भांडारकर यांनीदेखील अटल बिहारी वाजपेयी यांचं अंत्यदर्शन घेतलं. 

अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी नेपाळचे परदेश मंत्र प्रदीप कुमार, बांग्लादेशचे परदेश मंत्री अबुल हसन मदमूद अली भूटानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक आणि पाकिस्तानी प्रतिनिधीही भारतात दाखल झालेत.