'आर्थिक मंदीमुळे रोजगार निर्मिती घटणार, १५ लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता'

 तब्बल  १६ लाख रोजगार घटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Updated: Jan 14, 2020, 12:24 PM IST
'आर्थिक मंदीमुळे रोजगार निर्मिती घटणार, १५ लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता' title=

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात आर्थिक मंदीमुळे रोजगार निर्मिती घटणारेत. तब्बल  १६ लाख रोजगार घटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. एसबीआयच्या अहवालात अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या आर्थिक वर्षात 89.7 लाख नवे रोजगार तयार झाल्याची आकडेवारी भविष्य निर्वाह निधी संस्था म्हणजे EPFO नं दिली होती. 

यंदा भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही संख्या किमान पंधरा लाखानं घटण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

'आर्थिक मंदी नाही'

निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस यूपीए-२ (२००९-२०१४) आणि एनडीए सरकारच्या काळातील (२०१४-२०१९) आर्थिक परिस्थितीची तुलना केली. यूपीए-२ च्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात महागाईचा दर कमी होता. तसेच आर्थिक विकासदरही जास्त असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

२००९-२०१४ या काळात देशात १८९.५ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. मोदी सरकारच्या काळात हेच प्रमाण २८३.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचले.

तसेच यूपीए-२ च्या काळातील परकीय गंगाजळीचा आकडा ३०४.२ अब्ज डॉलर्स इतका होता.

मोदी सरकारच्या काळात परकीय गंगाजळी थेट ४१२.६ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचल्याचेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.