देशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती

 देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.

Updated: May 1, 2019, 06:31 PM IST
देशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती title=

लखनऊ : वीर जवानांच्या हौतात्म्याचा भाजप लोकसभा निवडणुकीसाठी सोईने वापर करत असल्याचा आरोप, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी बाराबंकीमध्ये केला. देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत, सोबतच सीबीआय, ईडी, आयकर यासारख्या स्वायत्त संस्थांनाही भाजपा सरकारमुळे धोका निर्माण झाला असल्याचा आरोप, मायावतींनी केला. 

काँग्रेसवर हल्लाबोल

ज्या काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक जिंकू दिली नाही त्या काँग्रेसचा पराभव करा असं आवाहन मायावतींनी केलंय. मायावतीनी उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभांमध्ये काँग्रेसवर टीका सुरू केलीय. मायावती सपासोबत युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. अनेक ठिकाणी बसपा सपाच्या उमेदवारांची लढत काँग्रेस उमेदवारांशी होणार आहे.

आझम यांच्यावर दोन दिवसांची बंदी 

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगानं दोन दिवसांची बंदी घातली आहे. भाजपा उमेदवार जयाप्रदा यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करत आचारसंहितेचा भंग केल्यावरुन, निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून ४८ तासांसाठी ही प्रचारबंदी लागू झाली आहे.