नवी दिल्ली : Tesla आणि SpaceX चे CEO एलोन मस्क नेहमीच काहीतरी वेगळे करण्यासाठी ओळखले जातात. इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाने टेक्सासच्या ऑस्टिनच्या Gigafactory मध्ये जॉबची मोठी ऑफर दिली आहे. या कारखान्यात काम करण्यासाठी 2022 पर्यंत 10,000 पेक्षा जास्त लोकांना भरती केली जाणार आहे.
टेस्लाने काढलेल्या रिक्त जागेत कोणतीही महाविद्यालयीन पदवीची गरज नाही. त्यामुळे पदवीधर नसलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्यामुळे किमान शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवार लगेचच नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी पदवीधर असेलेल उमेदवार देखील अर्ज करू शकतात. एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. मस्क यांनी Tesla Owners Of Austin चे ट्विट शेअर केले आहे. एलोन मस्क हे महाविद्यालयीन अभ्यासाला फारसे महत्व देत नाहीत. कॉलेजमध्ये नवं काही शिकवलं जात नाही असा त्यांना विश्वास आहे.
Over 10,000 people are needed for Giga Texas just through 2022!
- 5 mins from airport
-15 mins from downtown
- Right on Colorado river https://t.co/w454iXedxB— Elon Musk (@elonmusk) March 31, 2021
Elon Musk यांनी आपल्या ट्विटमध्ये या नोकरीचे फायदे देखील सांगितले आहेत. जॉब साइट विमानतळापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. शहरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आणि कोलोरॅडो नदीच्या उजव्या बाजूला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण सुरू ठेवून टेस्लामध्ये करिअर सुरू करण्याची इच्छा असलेल्यांना भरती करण्याचा विचार आहे.
ऑस्टिन अमेरिकन-स्टेटसमॅनने दिलेल्या वृत्तानुसार, टेस्लाने 10 हजार कर्मचार्यांना नोकरी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होणार आहे. याआधी त्यांच्याकडे 5 हजार कर्मचारी काम करत होते.