हैदराबाद : तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डी हिला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं, जेव्हा तिने भररस्त्यावर स्वत:चे कपडे काढून निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. हे धक्कादायक निदर्शन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबलं आहे. हैदराबादेतील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स ज्युबली हिल्स, येथे या अभिनेत्रीने हे निदर्शन केलं. श्री रेड्डी हिने कपडे काढून अर्धनग्न होण्यामागचं कारण सांगितलं की, तेलुगू म्हणजे टॉलिवूडमध्ये महिलांचं लैंगिक शोषण ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे, असे आरोप श्री रेड्डीने केले आहेत.
श्री रेड्डी हिने सोशल मीडियावर आणि टीव्ही रिपोर्टर्सशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. काही मोठे दिग्दर्शक, निर्माते आणि पुरूष कलाकार, हे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील नवीन येणाऱ्या मुलींचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप, श्री रेड्डीने केला आहे.
तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत कोणतीही भूमिका आपल्याला मिळत नाही, कारण आपल्याकडून अशा लोकांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, आणि आपल्याला ते मान्यही नाही. मूळ तेलुगू अभिनेत्रींना कामं मिळत नसल्याचा आरोपही श्री रेड्डी या अभिनेत्रीने केला आहे.