Coronavirus : आंध्रप्रदेशात अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी आईचा १४०० किमीचा प्रवास

ती आई होती म्हणूनी.....

Updated: Apr 11, 2020, 09:29 AM IST
Coronavirus : आंध्रप्रदेशात अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी आईचा १४०० किमीचा प्रवास  title=

मुंबई : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी देशभरात २१ दिवसांच लॉकडाऊन करण्यात आलं. संपूर्ण राज्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेकरताच तुम्ही घराबाहेर पडू शकता अशी ताकद देण्यात आली आहे. पण अशा परिस्थितीतही एका आईने तब्बल १४०० किमीचा प्रवास करून आपल्या मुलाची भेट घेतली आहे. अखेर आई ही आईच असते. 

४८ वर्षीय महिला रजिया बेगम यांनी सोमवारी सकाळी स्थानिक पोलिसांनी परवानगी घेऊन एकटी आंध्रप्रदेशला निघाली होती. एका महिलेसाठी १४०० किमीचा एकटीचा प्रवास काही सोपा नव्हता. मात्र आपल्या मुलाला घरी आणण्यासाठी तिची इच्छाशक्तीच महत्वाची होती. (Coronavirus : बाबावर लक्ष ठेव! पोलिसाच्या चिमुकलीचं देवबाप्पाला ग्रिटींग) 

आई रजिया सांगते की,'मी काही पोळ्यासोबत घेतल्या आणि निघाले. रस्त्यावर कुठेच रहदारी नाही की ट्रॅफिक नाही. हे सगळं घाबरवणारं होतं पण मुलासाठी मला हा प्रवास करणं गरजेचं होतं.'

रजिया या हैदराबादपासून २०० किमी दूर निजामाबाद स्थित असलेल्या एका सरकारी शाळेत कामाला आहेत. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं. त्यांना दोन मुलं असून एका मुलगा इंजिनिअर आहे तर दुसरा १९ वर्षीय मुलगा निजामुद्दीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 

निजामुद्दीनमध्ये १२ वीची परिक्षा दिल्यानंतर तो एमबीबीएसच्या परिक्षेकरता क्लासला जात होता. १२ मार्च रोजी मित्राला नेल्लोरच्या रहमताबाद येथे सोडण्यासाठी गेला होता. थोडे दिवस तिथे राहिल्यानंतर लॉकडाऊन घोषित झालं. यामुळे तो तिथेच अडकला. घरी परतायचं होतं मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. 

२१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यावर काही दिवस वाट बघून अखेर त्या आईने आपल्या मुलाला घरी आणण्याचा निश्चय केला. पोलिसांच्या भीतीने मोठ्या मुलाला नाही पाठवलं तर स्वतः ६ एप्रिलच्या रोजी सकाळी घरून निघाल्या. दुपारी नेल्लोरला पोहोचल्या. पुन्हा मुलाला घेऊन त्यांनी आपलं घर गाठलं.