तेजस्वी यादव आघाडीवर, घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आरजेडीचे ( Rashtriya Janata Dal) अध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे.  

Updated: Nov 10, 2020, 11:37 AM IST
तेजस्वी यादव आघाडीवर, घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी  title=
संग्रहित छाया

पाटणा : आरजेडीचे ( Rashtriya Janata Dal) अध्यक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा घातला आहे. बिहार विधानसभा ( Bihar Election Results) निवडणुकीच्या मतमोजणीत (Bihar Assembly Election Results)  राजद-काँग्रेसचे महागठबंधन पुढे असल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या घरासमोर गराडा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तेजस्वी यादव यांचा फोटो घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचे चित्र आहे. तेजस्वी यादव  (Tejashwi Yadav) हे त्यांच्या राघोपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत.

Assembly Election Results Live :  कोणाची किती आघाडी?

राज्यात सर्वत्र काँटे की टक्कर सुरू असून मतमोजणीत प्रचंड चुरस दिसून येत आहे. त्यामुळे आताच निकालाचं भाकित करणं घाईचं ठरू शकते. ३१ वर्षांच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिले. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत दिली.

दरम्यान, आरजेडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मासे भेट देणे हे शुभ संकेत मानले जातात. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आरजेडी आघाडीवर आहे म्हणूनच राबडी देवी यांच्या घराबाहेर आरजेडीचे कार्यकर्ते मासे घेऊन दाखल झाले आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या घराबाहेर गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता येणार असा विश्वास, भाजप नेते कैशाल विजयवर्गीय यांनी व्यक्त केला.