पोटात दुखतंय म्हणून दहावीतील मुलगी डॉक्टरकडे गेली, अन् रुग्णालयातील शौचालयात दिला बाळाला जन्म

Marathi News Today: दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने शौचालयात मुलीला जन्म दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 16, 2023, 05:17 PM IST
पोटात दुखतंय म्हणून दहावीतील मुलगी डॉक्टरकडे गेली, अन् रुग्णालयातील शौचालयात दिला बाळाला जन्म title=
Teenager gives birth to new born in hospital washroom

Marathi News Today: दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रुग्णालयातील शौचालयात मुलीला जन्म दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाने लगेचच मुलीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयातील वॉर्डमध्ये भरती रेले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देताच ते घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. 

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. हाथरस गेट क्षेत्रातील एका गावात राहाणारी अल्पवयीन मुलगी तिच्या आजोळी राहत होती. तिथेच ती इयत्ता दहावीत शिकत होती. अचानक तिची तब्येत खराब झाली. पोटदुखीमुळं ती हैराण झाली होती. त्यामुळं कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोटदुखीचा त्रास जास्त वाढल्याने तिला आपत्कालीन वॉर्डमध्ये घेऊन गेले. त्यानंतर शौचाला जाण्याचा बहाणा करुन ती बाथरुममध्ये गेली आणि तिने तिथेच बाळाला जन्म दिला. 

मुलीने बाळाचा जन्म देताच कुटुंबीय हैरण झाले. जेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत कळलं तेव्हा त्यांनी नवजात बाळ आणि मुलीला महिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, घडलेल्या प्रकारामुळं मुलीचे कुटुंबीयांना फारच धक्का बसला होता. त्यामुळं बाळाला रुग्णालयात सोडून पळून जात होते. मात्र, रुग्णालयाला याची कुणकुण लागताच त्यांनी पोलिस ठाण्यात याबाबत सूचना दिली. त्यानंतर मुलगी व तिच्या कुटुंबीयांना पुन्हा रुग्णालयातच थांबवण्यात आले. 

रुग्णालय प्रशासनाने दिली स्थानिक पोलिसांना माहिती

या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनानेही तात्काळ पोलिसांना घडलेला प्रसंग सांगितला. महिला चिकित्सा अधिकारी शैली सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील शौचालयातच एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. आत्तापर्यंत केलेल्या चौकशीत अल्पवयीन मुली तिच्या आजोळी शिकण्यासाठी गेली होती. त्याचवेळी त्याचठिकाणी असलेल्या युवकासोबत तिची ओळख झाली त्यांच्यात प्रेमसंबंधही निर्माण झाले. या युवकासोबत शारिरीक संबंधही तिने ठेवले होते. त्यामुळं ती गर्भवती राहिली. 

अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे घरात कोणालाच माहिती नव्हते. मुलीनेदेखील ही गोष्ट घरातील लोकांपासून लपवून ठेवल्याची चर्चा आहे. जेव्हा अल्पवयीन मुलीला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि वेदना असह्य झाल्यानंतर तिला साधी पोटदुखी असल्याचे समजून रुग्णालयात दाखल करण्यात आले.