चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही

Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा वाटा असलेला तंत्रज्ञावर रस्त्यावर इडली विकायची वेळ आली आहे. काय घडलं नेमकं

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2023, 08:53 AM IST
चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही title=
Technician Behind Chandrayaan-3s Launchpad Now Sells Idlis

Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चांद्रयान-3ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोची चांद्रयान-3 मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-3च्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या एका कर्मचाऱ्यावर मात्र रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील जुन्या विधानसभा भवनासमोर त्याचा इडलीचा स्टॉल आहे. दीपक कुमार असं त्याचे नाव असून चांद्रयान-3 या मोहिमेचा महत्त्वाचा भाग असलेल्या लाँचपॅड तयार करणाऱ्या एका टीममध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. 

दीपक सरकारी कंपनीत हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत टॅक्नीशियन या पदावर कार्यरत होता. मात्र, त्याला कंपनीतून जवळपास 18 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळं घर चालवण्यासाठी इडलीचा स्टॉल सुरू करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. HECच्या टीमनेच चांद्रयान-3 चा स्लायडिंग डोर आणि लाँन्चपॅडचा फोल्डिंग प्लॅटफॉर्म बनवला होता. त्या टीममध्येच दीपक होता. मात्र, गेल्या कित्येक महिन्यापासून त्याला पगारच मिळालेला नाहीये. 

2,800 कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही

BBCच्या एका अहवालानुसार, दीपक उपरारियासह HECच्या तब्बल 2,800 कर्मचाऱ्यांना तब्बल 18 महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये. त्यामुळं उपरारिया यांना घर चालवण्यासाठी इडलीचा स्टॉल टाकावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी हा स्टॉल सुरू केला आहे. इडली विकण्याबरोबरच ते कंपनीत जाऊन त्यांचे कामही करतात. सकाळी ते इडलीचा स्टॉल चालवतात त्यानंतर ऑफिसला जातात आणि संध्याकाळी पुन्हा इडलीच्या स्टॉलवर जाऊन रात्री घरी जातात. 

दीपक यांनी म्हटलं आहे की, सुरुवातीला त्यांना पगार न मिळाल्यामुळं क्रेडिट कार्ड वापरुन घरखर्च चालवावा लागायचा. मात्र, केडिट कार्डच्या बिलामुळं त्यांच्यावर 2 लाखापर्यंतचे कर्ज झाले. क्रेडिट कार्डचे हफ्ते न भरल्यामुळं बँकेने त्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित केले होते. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून चार लाख रुपये उधार घेऊन इडलीचा स्टॉल सुरू केला. आजपर्यंत मी लोकांचा एकही रुपया परत करु शकलो नाहीये. त्यामुळं आता कोणी उधार देणेही बंद केले आहे. मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून काही दिवस घर खर्च भागवला. पण उपासमारीची वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून इडली विकण्यास सुरुवात केली. 

झी बायको खूप चांगली इडली बनवते. मी इडली विकून दररोज 300 ते 400 रुपये कमावतो, त्यातून माझा नफा 50 ते 100 रुपये आहे. अशा पद्धतीने माझे घर सुरू आहे. दीपक हा मध्य प्रदेशचा रहिवासी असून 2012 मध्ये रांचीला स्थायिक झाला आहे. 2012 मध्ये एका खासगी कंपनीतील नोकरी सोडून तो एचईसीमध्ये नोकरीला आला. सरकारी कंपनी असल्याने आपले भविष्य चांगले होईल या विचाराने तो 8,000 रुपये पगारावर HEC मध्ये रुजू झाला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x