चहा पिणारी पोरं हुश्शार !!

अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की... 

Updated: Nov 29, 2019, 10:46 AM IST
 चहा पिणारी पोरं हुश्शार !!  title=

मुंबई : 'चहा पिऊनच' दिवसाची सुरूवात करायची ही जणू भारताची परंपराच.... आणि सायंकाळ झाली की, हातात चहाचा कप घेऊन गप्पा मारयाच्या ही दुसरी. पावसात तर चहा आणि गरमागरम भजी हे तर खास समीकरण... भारतीयांना चहा आवडतो हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अगदी कश्मीरच्या कहवापासून ते लोकल टपरीवरील कट्टींगपर्यंत या चहाने देशाला वाचवलं आहे असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. फक्त भारतातच नव्हे तर इंग्लिशमॅन देखील चहा प्यायलाशिवाय दिवसाची सुरूवात करायचे नाही तर जपानी लोकांमध्ये चहा पिण्याचा एक सोहळाच असतो. तुम्ही म्हणाल आम्ही हे सगळं का सांगतोय? तर चहा प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी... 

सिंगापूरमधील नॅशनल युनिर्व्हसिटीच्या अभ्यासानुसार, चहा पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा चहा न पिणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूपेक्षा अधिक सुदृढ असतो. या अभ्यासामुळे ही गोष्ट अधोरेखित झाली आहे की, चहा पिणाऱ्या व्यक्तीचा मेंदू अधिक कार्यक्षम असतो. 

संशोधकांनी याकरता सत्तरवर्षांपर्यंतच्या व्यक्तींचे दोन ग्रुप केले. यामध्ये चहाप्रेमी आणि चहा न पिणाऱ्या व्यक्तींची वर्गवारी केली होती. हे संशोधन 2015 ते 2018 पर्यंत सुरू होतं. 36 ज्येष्ठ व्यक्तींचे वर्गिकरण करण्यात आले. ज्यामध्ये त्यांच्या आरोग्याची, जीवनशैली आणि मानसिकतेची तपासणी करण्यात आली आहे. या संशोधनातून चहा मानवाच्या मेंदूकरता फायदेशीर असल्याच समोर आलं आहे. 

1. केसांना चमकदार ठेवतात 
जर तुम्हाला केसांना चांगली शाइन हवी असेल तर ग्रीन टीचा वापर करा. ग्रीन टी आणि दररोजच्या वापरातील काळी चहा यांना बनवण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. ग्रीन टी ऑक्सीडाइज नसते त्यामुळे त्याच्या पानात इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. 

2. डोळ्यांना आकर्षक बनवतात 
डोळे थोडे सुजल्यासारखे वाटत असतील तर चिंता करू नका. वापरलेली टी बॅग तुमच्या समस्येवर उपाय आहे. स्ट्रेस, एलर्जी, जास्त मद्य प्राशन केल्यामुळे हार्मोनल बदलामुळे डोळ्याच्या खाली सुज येते.