अनवाणी पायांनी आला Swiggy Delivery Boy; प्रेरणादायी कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी

स्विगी डिलिव्हरी बॉयची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय

Updated: Sep 30, 2022, 09:38 AM IST
अनवाणी पायांनी आला Swiggy Delivery Boy; प्रेरणादायी कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी title=

Swiggy Delivery Guy : कुटुंबाच्या उदर्निवाहासाठी अनेक फुड डिलिव्हरी बॉय (Swiggy Delivery Agent) कशाप्रकारे काम करत असतात याच्या प्रेरणादारी कथा सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा व्हायरल होत असतात. अशाच एका स्विगी डिलिव्हरी बॉय (Swiggy Delivery Agent) म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गोष्ट सध्या व्हायरल झाली आहे. एका ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला अनवाणी पायांनी (bare feet) काम करताना पाहिले आणि याबाबत माहिती सोशल मीडियावर (Social Media) दिली. त्या डिलिव्हरी बॉयची प्रेरणादायी गोष्ट लिंक्डइनवर (LinkedIn) शेअर केली  जी आता व्हायरल झाली आहे.  तारिक खान यांनी एका स्विगी डिलिव्हरी बॉयची गोष्ट शेअर केली जो अनवाणी काम करत होता.

तारिक खान यांनी चौकशी केल्यावर, डिलिव्हरी बॉयने त्यांना सांगितले की त्या दिवशी त्याचा अपघात झाला होता आणि त्याच्या पायाला आणि घोट्याला सूज आली होती. तारिक खानने जेव्हा त्याला आराम करायला हवा होता, असा सल्ला दिला तेव्हा डिलिव्हरी बॉयने सांगितले की त्याला त्याच्या कुटुंबाचे पोट भरायचं आहे. त्यानंतर तो हसला आणि परत गेला. तारिक खान यांनी त्यांची प्रेरणादायी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायचे ठरवले. तारिक खान यांनी लिंक्डइनवर या डिलिव्हरी बॉयचा फोटो पोस्ट केला आणि, 'आत्ताच एका स्विगी डिलिव्हरी एजंटला भेटलो जो माझ्यासोबत लिफ्टमध्ये अनवाणी होता. मी त्याला विचारले की तो बूट का घालत नाही?' असे कॅप्शनमध्ये लिहिले.

"आज त्याचा अपघात झाला असून पायाला आणि घोट्याला सूज आल्याचे त्याने सांगितले. मी उत्तर दिले की, मग तुम्ही आराम करा, काम करू नका. तो हसला आणि म्हणाला की माझ्याकडे पोट भरण्यासाठी एक कुटुंब आहे. तो लिफ्टमधून बाहेर पडला आणि म्हणाला, 'सर गुड इव्हिनिंग'. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच मला कठोर परिश्रम करण्याची आणि गरज असेल तेव्हा स्वतःला पुढे ढकलण्याची प्रेरणा मिळते. मला आशा आहे की स्विगी या माणसाला त्याच्या मेहनतीचे फळ देईल आणि माझा मुद्दा समजून घेईल," असे तारिख खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Swiggy Delivery Guy

लोकांना केले मदतीचे आवाहन 

पोस्ट शेअर केल्यानंतर तारिक खान यांनी लोकांना प्रत्येक प्रकारे त्या व्यक्तीची आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. तारिक खान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, "जो कोणी या व्यक्तीला मदत करू इच्छित असेल तो मला इनबॉक्स करू शकतो आणि मी तुम्हाला त्याचा पेटीएम नंबर देऊ शकतो. त्याला मदतीची गरज आहे आणि ज्याला मदत करायची असेल त्याला माझा नंबर द्या असे त्याने मला सांगितले. विशेषत: ज्यांना त्यांच्या गोपनीयतेची काळजी होती आणि मी त्यांची परवानगी घेतली आहे का ते मला विचारत होते तसेच, जे मला शूज वगैरे देण्यास सुचवत होते, ते पुढे येऊन थोडे औदार्य दाखवू शकतात, असेही म्हटलं आहे."