मासिक पाळीत स्वयंपाक केल्यास स्त्रीचा पुढील जन्म श्वानाचा

महिलांच्या मासिक पाळी संदर्भात स्वामी कृष्णा स्वरूप यांच वादग्रस्त वक्तव्य

Updated: Feb 18, 2020, 03:20 PM IST
मासिक पाळीत स्वयंपाक केल्यास स्त्रीचा पुढील जन्म श्वानाचा  title=

मुंबई : इंदुरीकर महाराजांनी स्त्रियांबाबत वक्तव्य चर्चेत असताना आणखी एका स्वामींनी स्त्रियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिलांच्या मासिक पाळी संदर्भात स्वामी कृष्णा स्वरूप यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील संत स्वामी कृष्णा स्वरूप यांनी महिलांनी मासिक पाळीवेळी भोजन तयार केल्यास तिचा पुढील जन्म कुत्रीचा होता आणि ते भोजन पुरूषाने खाल्ल्यास त्याचा पुढील जन्म बैलाचा होतो. आपल्या अनुयायांना अशाप्रकारे चुकीचे उपदेश करणारा त्यांचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामुळे सर्वत्र नाराजीचे सुर उमटत आहेत. 

सोमवारी स्वामी कृष्णा यांनी अनुयायांना संबोधित करताना हे म्हटलं. पुढे देखील ते म्हणाले की,'भलेही ही गोष्ट कुणाला कटू वाटेल पण हे खरे आहे,' तसेच मासिकपाळी दरम्यान महिलांनी स्वयंपाक घरापासून दूर राहिले पाहिजे. नाही तर नरकात जायला तयार राहा, असं देखील ते म्हणाले. (इंदुरीकर सम-विषम वाद | तृप्ती देसाईंना धमकी दिल्याप्रकरणी स्मिता अष्टेकर पोलिसांच्या ताब्यात) 

स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी पुरुष अनुयायांना चेतावणीही दिली की, “भलेही तुम्ही मासिकपाळीत असलेल्या स्त्रीकडून बनवलेल्या अन्नाचं सेवनं कराल पण तीला याची समज नाही की, या तीन दिवसात तीने बनवलेल्या अन्नाचा काय प्रभाव पडतो. या बिंदूमधील प्रत्येकाला शास्त्रात परिभाषित करण्यात आलं आहे. म्हणून लग्नापूर्वीच तुम्हाला जेवण बनवता आलं पाहिजे.”