सीएम अमरिंदर सिंह यांच्या हस्ते लुधियानात CN-IFFCO व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनीटचं भूमीपूजन

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी गुरूवारी पंजाबच्या समरालामध्ये भाजीपाला प्रक्रिया केंद्राचं भूमीपूजन केलं. इफको आणि स्पेनची कंपनी सीएन कॉर्प मिळून ५२१ कोटी रूपयांचा हा प्रकल्प तयार करत आहेत.

Updated: Jun 4, 2019, 05:53 PM IST
सीएम अमरिंदर सिंह यांच्या हस्ते लुधियानात CN-IFFCO व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनीटचं भूमीपूजन title=

समराला (लुधियाना): पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी गुरूवारी पंजाबच्या समरालामध्ये भाजीपाला प्रक्रिया केंद्राचं भूमीपूजन केलं. इफको आणि स्पेनची कंपनी सीएन कॉर्प मिळून ५२१ कोटी रूपयांचा हा प्रकल्प तयार करत आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी यावेळी सांगितलं की, या प्रकल्पामुळे राज्यातील औद्योगिक वाढ तर होईल, पण रोजगाराच्या संधी देखील वाढतील.

पंजाब सरकारने आतापर्यंत २९९ एमओयूंना मंजुरी दिलेली आहे - अमरिंदर सिंह 

पंजाब सरकारच्या औद्योगिक भूमिकेवर अमरिंदर सिंह म्हणतात, मंडी गोंबिंदगड औद्योगिक क्षेत्रामुळे ६०० युनिट पुन्हा नव्याने सुरू होतील. तर ४० नवीन युनिटमध्ये गुंतवणूक देखील करण्यात आली होती. 

पंजाब सरकारने आतापर्यंत अनेक कंपन्यांशी ५१ कोटी ९६९ करोड रूपयांच्या करारावर सहमतीसाठी हस्ताक्षर केले आहेत. सिंह म्हणतात की, त्यांच्या कार्यकाळात दरम्यान त्यांनी ४६ हजार ९०२ कोटी रूपयांचे एकूण ६५० प्रकल्प आणले. यात 1,67,309 रोजगार उपलब्ध होवू शकतात.

५२ एकर जागेत होणार भाजीपाला प्रोसेसिंग युनीटचा विस्तार

समरालामध्ये व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनीट ५२ एकर जागेत येणार आहे. या प्रोजेक्टची प्रोसेसिंग क्षमता ८० हजार टन वार्षिक असणार आहे, यावर १ हजार कोटी रूपये वार्षिक खर्च असणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, या योजनेत २५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती होईल. ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. कारण १५० किलोमीटर अंतरात स्थानिक शेतकऱ्यांकडून १५ हजार टन भाजीपाला खरेदी केला जाईल.

2020 पासून प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरूवात

या योजनेत ब्रोकली, फूलकोबी, गाजर, मक्का सारख्या भाज्या आणि इतर गोष्टींवर प्रोसेसिंग होईल. तसेच बटाट्यापासूनही फ्रेंच फ्राय आणि सकाळच्या उपहारासाठी संबंधित काही उत्पादनं बनवली जातील.