'दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही'

दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलीय. 

Updated: Sep 21, 2017, 09:46 PM IST
 title=

नवी दिल्ली : दहशतवादाचं कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडलीय. 

हर एक प्रकारच्या दहशतवादाचाही सुषमा स्वराज यांनी यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी सुषमा स्वराज सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. 

शांघाय सहकार्य परिषदेतल्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. शांघाय सहकार्य परिषदेतल्या सदस्य देशांशी दृढ संबंध हा भारताचा मुख्य उद्देश असल्याचं स्वराज म्हणाल्या. 

सोबतच सदस्य देशांत परस्पर सहकार्य आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी हे दृढ संबंध उपयुक्त ठरतील असंही त्यांनी या निमित्तानं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांचीही भेट घेतली.