दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

मुंबईतील नागपाड्यात दाऊदची संपत्ती आहे. ही संपत्ती अमीना आणि हसीना यांच्या नावावर आहे. मात्र या दोघीही हयात नाहीत. मात्र दाऊदने ही संपत्ती बेकायदेशीररित्या मिळवल्याचे तपास यंत्रणांनी म्हटलं होतं.

Updated: Apr 21, 2018, 06:50 PM IST
दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका title=

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय. मुंबईतील दाऊदची संपत्ती जप्त करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिलीय. दाऊदची आई अमीना आणि बहिण हसीना पारकरच्या नावाने दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

दाऊदची संपत्ती कुणाच्या नावावर?

मुंबईतील नागपाड्यात दाऊदची संपत्ती आहे. ही संपत्ती अमीना आणि हसीना यांच्या नावावर आहे. मात्र या दोघीही हयात नाहीत. मात्र दाऊदने ही संपत्ती बेकायदेशीररित्या मिळवल्याचे तपास यंत्रणांनी म्हटलं होतं.

अबू सालेमलाही दणका

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा पॅरोलचा अर्ज रद्द करण्यात आलाय. लग्न करण्यासाठी सालेमनं हा पॅरोल मागितला होता. मात्र 45 दिवसांचा सालेमचा हा पॅरोल अर्ज रद्द करण्यात आलाय. मुंब्रा इथं राहणा-या सईद बहार कौसर उर्फ हिना हिच्याशी 5 मे रोजी लग्न ठरल्याचा सालेमनं या अर्जातून दावा केला होता. मात्र त्याचा लग्नासाठीचा हा पॅरोल अर्ज फेटाळण्यात आलाय.