Supreme Court of India Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरी, दरमहा 63068 रुपये पगार, जाणून घ्या

भारतीय सर्वोच्च न्यायालयने कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार याबाबतची माहिती sci.gov.in वर सहजपणे मिळवू शकतात.

Updated: Jun 19, 2022, 04:21 PM IST
Supreme Court of India Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरी, दरमहा 63068 रुपये पगार, जाणून घ्या title=

Supreme Court of India Recrutiment 2022: भारतीय सर्वोच्च न्यायालयने कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार याबाबतची माहिती sci.gov.in वर सहजपणे मिळवू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2022 आहे. एससीआय जेसीए अर्जाची लिंक आधीपासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. 30 वर्षांवरील उमेदवार या जागेसाठी पात्र नाहीत.

पात्र उमेदवारांना त्याच दिवशी संगणकावर ऑब्जेक्टिव टाइप लेखी परीक्षा आणि टायपिंग (इंग्रजी) चाचणी द्यावी लागेल. जे टायपिंग परीक्षेत पात्र ठरतील त्यांना मुलाखतीच्या तारखेनंतर डिस्क्रिप्टिव चाचणीसाठी बोलावले जाईल. या भरती प्रक्रियेतून 210 पदे भरायची आहेत.

या पदासाठी किती पगार असेल?

पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 6 नुसार, मूळ वेतन दरमहा 35,400 रुपये आहे.

एचआरएसह ग्रॉस सॅलरी रु. 63068 प्रति महिना असेल (पूर्व सुधारित वेतनमान पीबी-2 ग्रेड पे रु. 4200/- सह).

पात्रता आणि फी

या पदांच्या भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. याशिवाय संगणकावर इंग्रजीमध्ये टंकलेखनाचा वेग 35 शब्द प्रति मिनिट असावा. संगणकाचे ज्ञान असावे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अर्ज फीबद्दल बोलायचे तर, सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील. दुसरीकडे, SC, ST, माजी सैनिक, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक यांना 250 रुपये द्यावे लागतील.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम SCI च्या अधिकृत वेबसाईट main.sci.gov.in ला भेट द्या. तेथे तुम्हाला 'Recruitment Online Application for the post of Junior Court Assistant in the Supreme Court of India (Closing Date for online application:-10.07.2022 at 23.59 hours)लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा. आता आपली नोंदणी करा. त्यानंतर तुमचा अर्ज भरा. फॉर्म भरल्यानंतर फी भरा. https://examinationservices.nic.in/examsys22/root/home.aspx?enc=Ei4cajBk... या लिंकवरून तुम्ही सर्वोच्च न्यायालयात नोकरीसाठी अर्ज करू शकता.