Chandrayaan 3 And Supermoon: ऑगस्टमध्ये दोनदा सुपरमून दिसणार आहे. सूपरमून आणि चांद्रयान-3 या काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सुपरमून म्हणजेच या दिवशी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर कमी असते. त्यामुळं सुपरमून असतानाच चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे का? यामागे काही कारण आहे का? चंद्रयान-३ आणि सुपरमूनचा खास संबंध आहे. जाणून घ्या सविस्तर 1 ऑगस्ट रोजी सूपरमून होता तर आता 30 ऑगस्ट रोजी पुन्हा सुपरमून असणार आहे.
एक ऑगस्ट रोजी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर 357,530 किलोमीटर इतके होते. यापूर्वी 2-3 जुलै रोजी जे सूपरमून दिसले होते त्यावेळी पृथ्वीपासून 361,934 किमी अंतर होते. यानंतर याच महिन्यात 30 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा सुपरमून दिसणार आहे. 357,344 किमी इतकी असेल. हा या महिन्यातील दुसरा सुपरमून असेल त्यामुळं याला ब्लू मून असं म्हणतात. चंद्रयान-३ आणि सूपरमून यांच्यात काय संबंध आहे, हे जाणून घेऊया.
चांद्रयान-3 सध्या 288 किलोमीटर पेरीजी आणि 369328 किलोमीटर एपोजी कक्षेत यात्रा करत आहे. म्हणजेच जर चंद्रयाना-3ने चंद्राची गुरुत्वाकर्षणापर्यंत पोहोचु शकले नाही तर ते दहा दिवसांची यात्रा करत 288 किलोमीटर असलेल्या पेरीजीमध्ये परत येईल. सुपरमून असताना चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. याचाच फायदा चंद्रयान-3ला होणार आहे. म्हणजेच चंद्रयान- ३ला कमी प्रवास करावा लागणार आहे.
सामान्यतः चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर हे 3.60 लाख किलोमीटर इतके आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान-३ अशावेळी लाँच केले जेव्हा पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर कमी होईल. चंद्र दोनदा पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळं जेवढ अंतर कमी तितकाच वेळ आणि इंधन कमी लागते. इतकंच नव्हे तर या महिन्यात चंद्र पृथ्वीच्या जवळ असणार आहे. याचाच फायदा इस्त्रोच्या वैज्ञांनिकांनी घेतला आहे. चांद्रयान-३ आता 38,520 किलोमीटर प्रतितास या गतीने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत आहेत. प्रत्येक दिवशी याची गती कमी करण्यात येईल. कारण यावेळी चंद्र पृथ्वीच्या जवळ येईल. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावरुन जवळपास ११ हजार किलोमीटर दूर पृथ्वीचे आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण शून्य असेल. याला L1 पॉइंट असे म्हणतात.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या तुलनेते ६ पट कमी आहे. त्यामुळं चांद्रयाना-३ची गती कमी करावी लागते. जर गती कमी केली नाही तर यान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार नाही. 5 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या दरम्यान चांद्रयांन-३ची गती कमी करण्यात येईल. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत चांद्रयान-३ची गती जास्त आहे. ती कमी करुन 1 किलोमीटर प्रती सेंकदवर आणावी लागणार आहे. म्हणजेच 3600 किलोमीटर प्रतीतास चांद्रयानाची गती असणार आहे. ही गती ठेवली तरच चांद्रयान चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश करु शकेल. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या आधारे यान पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे.