व्हिडीओ पाहा... स्टंटबाजी, एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात पिस्तुल

पिस्तुल दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न  

Updated: Jan 3, 2022, 12:07 PM IST
व्हिडीओ पाहा... स्टंटबाजी, एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात पिस्तुल  title=

सुरत : सोशल मीडियावर दोन तरुणांच्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे दोघे स्टंटबाज बाईकवरून फिरून दहशत माजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकजण बाईक चालवतोय तर दुसरा तरुण त्यांच्या खांद्यावर बसून सिगारेट पित आहे. तर त्याच्या दुस-या हातात पिस्तूल दिसत आहे. रात्री भरधाव वेगात बाईक चालवत दोघेही स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सूरतमधील असल्याचा बोललं जात आहे. 

गुजरातच्या गृहराज्य मंत्र्यांनी हा व्हिडीओ ट्विट करून नाईट कर्फ्यूचं उल्लंघन करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे दोघांनी व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी स्टंटबाजी केल्यांचं सांगितलं आहे. शिवाय त्यांच्या हातात जी पिस्तुल दिसत आहे, ती पिस्तुल नसून लायटर असल्याचं समोर येत आहे.