दोन हजार कोटी रुपयांचं साम्राज्य, चहा ब्रँडचं नाव 'वाघ-बकरी' कसं पडलं? खूपच रंजक कहाणी

प्रसिद्ध चहा ब्रँड असलेल्या 'वाघ-बकरी' कंपनीचे मालक आणि व्यवस्थापिक संचालक पराग देसाई यांचं वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झालं. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पराग देसाई रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला मार बसला. रुग्णालयात उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

राजीव कासले | Updated: Oct 24, 2023, 09:00 PM IST
दोन हजार कोटी रुपयांचं साम्राज्य, चहा ब्रँडचं नाव 'वाघ-बकरी' कसं पडलं?  खूपच रंजक कहाणी title=

Story Of 100 Years Old 'Wagh Bakri Tea' : 'वाघ बकरी' आज देशातला तिसरा सर्वात मोठा चहाचा ब्रँड (Tea Brand) आहे. देशातल्या 24 राज्यात आणि जगातल्या 60 देशांमध्ये लोकप्रिय झालेल्या चहाच्या ब्रँडचं नाव 'वाघ-बकरी' असं का? असा अनेकांना प्रश्न पडतो. आज 'वाघ बकरी' चहाचं दोन हजार कोटी रुपयांचं साम्राज्य आहे.  दोन दिवसांपूर्वीच 'वाघ बकरी' चे मालक आणि व्यवस्थापकिय संचालक पराग देसाई यांचं निधन (Parag Desai Death) झालं. अवघ्या 49 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदाबादमध्ये राहाणाऱ्या पराग देसाई यांच्यावर मार्गिंग वॉकदरम्यान भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) हल्ला केला. यावेळी त्यांचा तोल जाऊन ते पडले आणि डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना ब्रेन हेमरेजचा अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

कशी झाली 'वाघ-बकर'ची सुरुवात
 'वाघ बकरी' ची सुरुवात 1892 झाली झाली.  'वाघ बकरी' चे फाऊंडर नारणदास देसाई आपलं नशिब घडवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तिथे त्यांनी मोठ्या कष्टाने पैसा उभा करत 500 एकरमध्ये पसलेली चहाची बाग विकत घेतली आणि चहा पाऊडर विकायला सुरुवात केली. त्यावेळी भारतासारखंच दक्षिण आफ्रीकाही ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तिथल्या स्थानिक लोकांना आणि भारतीयांना वर्णभेदाचा सामना करावा लागत असे. त्यावेळी नारणदास देसाई यांना सुद्धा वर्णभेदाचा सामना करावा लागला. त्याचवेळी नारणदास महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. 1915 मध्ये नारणदास देसाई यांना दक्षिण आफ्रिका सोडावा  लागला आणि ते भारतात परतले. त्यावेळी महात्मा गांधी यांनी नारणदास यांच्या इमानदारीचं कौतुक करत त्यांना एक पत्र दिलं. या पत्रामुळे त्यांना गुजरातमध्ये आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा मार्ग सोपा झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर कायम राहिला.

असं पडलं 'वाघ-बकरी' नाव
गुजरातमध्ये परतल्यानंतर 1919 मध्ये नारणदास यांनी अहमदाबाद मध्ये गुजरात टी डेपो नावाने व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला त्यांनी खुल्या स्वरुपात चहा पावडरची विक्री सुरु केली. 1980 पर्यंत त्यांच्या कुटुंबियांनी खुली चहा पावडर विकली. त्यानंतर ते पॅकेजच्या रुपाच चहा विक्रीला सुरुवात केली. इंग्रजांकडून झालेल्या वर्णभेदाचा नारणदास यांच्या मनावर चांगलाच आघात झाला होता. 1934 च्या आसपास त्यांनी गुजरात टी डेपोचं नाव बदलून  'वाघ बकरी'  असं ठेवलं. या ब्रँडने नारणदास यांना नवी ओळख दिली. काही काळातच हे नाव आणि चहाचा ब्रँड लोकांमध्ये लोकप्रिय झाला. 

2000 कोटी रुपयांचं साम्राज्य
'वाघ बकरी' च्या लोगोत एका व्यक्तीच्या हाताच चहाचा कप आहे. तर एका मोठ्या पोल्यात बकरी आणि वाघ चहा पिताना दाखवण्यात आलेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा लोगो लोकांमधला भेदभाव कमी करणारा आहे. लोगोतला वाघ हा उच्च वर्गाचं प्रतिनिधित्व करतो तर बकरी ही सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करते. पण चहा एक असं पेय आहे, जो श्रीमंत आणि गरिबीतला फरक मिटवतो. मार्किटिंग जगतातलं सर्वात मोठं नाव असलेल्या फिलिप कोटलर यांनीही  'वाघ बकरी' चा लोगो आणि त्याच्या रंजक कहाणीला आपल्या पुस्तकात जागा दिली आहे. हा लोगो खूप अनोखा असल्यांच त्यांनी नमुद केलं आहे. 

पंचतंत्रतल्या गोष्टीशी साम्य
 'वाघ बकरी' चा लोगो भारतात प्रसिद्ध असलेल्या पंचतंत्र गोष्टींशीही साम्य दाखवणारा आहे. या पुस्तकातून प्राणी-पक्षींविषयी प्रेम व्यक्त करणारा संदेश दिला जातो.  'वाघ बकरी' चा चहा ब्रँडच्या लोगोमधूनही हेच सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.